100 टक्के ! ब्राम्हण तरुणांची टाळकी,संघामुळे सडकी 

ना पत्ता ना नंबर ना गाव ना शहर ठाऊक, ना नमूद केलेले अशा राज गोखले नावाच्या व्यक्तीचा रा स्व संघाविषयीचा एका वेगळ्या विषयावरचा लेख अलीकडे वाचण्यात आला, संघ विरोधकांची डोकी कशा पद्धतीने चालू शकतात त्यावरचा हा डोक्याला झिणझिण्या आणणारा लेख, त्यावर लिहिणे बोलणे आवश्यक वाटले. लेखाची जी सुरुवात आहे त्यावरून नेमका विषय आणि गाभा लगेच तुमच्या लक्षात येईल, मी जरी संघ स्वयंसेवक नसलो तरी आचार विचारांनी आणि जातीने ब्राम्हण असल्याने तसेच वडील संघाचे कट्टर होते त्यामुळे नेमका संघ बऱ्यापैकी समजलेला असल्याने राज गोखलेंना नेमके उत्तर देण्याचा मला अधिकार आहे. ‘ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्राम्हण तरुणांची माथी भडकविण्याचा उद्योग आतातरी बंद करावा. 1925 सालापासून स्वातंत्र्य लढ्यात कोणत्याही प्रकारे भाग न घेता ह्या देशाच्या एकता आणि अखंडतेला सुरुंग रा स्व संघाने लावला आहे. ब्राम्हण समाजाचे सर्वाधिक वैचारिक नुकसान रा स्व संघाने केले आहे. ‘ या पद्धतीच्या वाक्यांची रेलचेल गोखलेंच्या लेखात आहे. राज गोखले हे नाव पत्रकार लेखक किंवा समाजसेवक म्हणून याआधी ना कधी ऐकलेले ना कधी वाचलेले, त्यामुळे एखाद्या ब्राम्हणेतर डोक्यातून निघालेली हि सडकी कल्पना नक्की असावी असे वारंवार लेख वाचतांना जाणवते. रा स्व संघाने ब्राम्हण तरुणांची माथी भडकावली का तर अजिबात नाही, याउलट नागपुरातल्या ब्राम्हण बुजुर्गांनीच त्यावेळेच्या मूठभर ब्राम्हण तरुणांना या देशात हिंदुत्व अबाधित राखायचे असेल तर त्यासाठी ब्राम्हणांनी हिंदूंनी कसे भगव्या झेंड्याखाली एकत्र येणे आवश्यक आहे समजावून सांगितले जे अतिशय सावध पाऊल टाकणाऱ्या विचारपूर्वक भूमिका घेणाऱ्या किंवा बदलणाऱ्या अभ्यासू राष्ट्रवादी ब्राह्मणांच्या नेमके लक्षात आल्याने त्यांनी त्यानंतर आजतागायत कुठल्याही अपेक्षेविना अगदी उघड संघाला उचलून धरले, बहुतेक ब्राम्हण संघमय झाले. संघाला अपेक्षित यश मिळाल्यानंतर ब्राम्हणांशिवाय संघ आणि संघाच्या मुशीतून तयार झालेला भाजपा किंवा इतर समस्त संघटना प्रकल्प हा विचार प्रत्यक्ष राबविण्यात याच ब्राम्हणांनी पुढाकार घेतला, हा निर्णय त्यांच्या त्यागाचा परमोच्च बिंदू होता, संघ भाजपातून एकटेच गांधी पद्धतीचे हिंदू वर्ज्य आणि मुस्लिमप्रिय असलेले घराणे कधीही पुजल्या गेले नाही, आजही केवळ जाज्वल्य देश्प्रेमालाच संघात आणि प्रत्येक ब्राम्हण कुटुंबात अनन्यसाधारण महत्व आहे…

गोखले, केवळ ब्राह्मणाना नव्हे तर समस्त हिंदूंना सुरक्षेचे कवच संघामुळे हे महत्वाचे किंवा ब्राम्हणांनी रा स्व संघाच्या नादी लागणे बंद करावे, तुमचे सांगणे, मग संघ सोडून ब्राम्हणांनी गांधींच्या काँग्रेसमागे धावावे किंवा राज्यातल्या वादग्रस्त मुसलमानांना जवळ घेणाऱ्या त्यांना सुरक्षकवच सतत देणार्या पवारांच्या, पवार जिवंत असेपर्यंत राष्ट्रवादीत विलीन व्हावे कि इसिस एमआयएम च्या पालख्या आम्ही उचलाव्यात, असे का तुमचे सांगणे आहे? मूठभर हिंदू जगातल्या धर्मांध शक्तींनी वेढल्या गेले आहेत, केवळ हिंदूच खतरेमें, असे वातावरण आहे, अशावेळी केवळ एक मुलगा फारतर मुलगा मुलगी, समस्त ब्राह्मणांची कुटुंब संस्कृती त्यातला एकुलता एक मुलगा जेव्हा संघ प्रचारक म्हणून बाहेर पडतो तेव्हा मला हिंदू आणि ब्राम्हण असल्याचा अभिमान वाटतो. प्रचारक म्हणून बाहेर पडणारे संघाचे सारेच उच्च शिक्षित विशी बाविशीतले तरुण त्यांच्या सोबतीने बाहेर पडणारे इतर सारे कुठे प्रेमात पडलेले किंवा सारेच पैशांच्या मागे त्याचवेळी संघ प्रचारक संपूर्ण भावभावना लोभ तारुण्य ऐहिक सुखांना लाथाडून जगाच्या देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यात संघटन वाढविण्यासाठी संघाचे विचार अनेकांच्या मनात नव्याने रुजविण्यासष्ठी वणवण फिरतो, अमुक एखादा किती वर्षे कि आजन्म अविवाहित राहून प्रचारक म्हणून फिरतांना एकीकडे त्याच्या आईवडिलांचे हृदय पिळवटून निघते पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याही मनात केवळ राष्ट्रप्रेम ओतप्रोत भरलेले त्यामुळे मन घट्ट करून पोटच्या गोळ्यांकडे अभिमानाने बघणारे असे समस्त ब्राम्हण आणि हिंदू मायबाप, तुम्हाला ते न कळणारे न कळलेले. एखादा डॉक्टर कसा अनेक वर्षे शिकल्यानंतर पोटापाण्याला लागतो तेच तारुण्याच्या भाव भावनांना मोहाला लाथाडणारे असे संघ प्रचारक, केव्हातरी 30-35 नंतर पोटापाण्याचा स्वतःच्या संसाराचा विचार करणारे. ब्राम्हणांच्या राष्ट्रवादी हिंदुत्ववादी भूमिका आता जर तुमच्यासारख्या ब्राम्हणांनाच बोचू लागल्या तर हे हिंदुराष्ट्र वाचवायचे कोणी, संघविचारांच्या हिंदूंना ब्राम्हणांना देशप्रेमापोटी नादी लागणे तुमचे सांगणे, आम्हा समस्त ब्राम्हणांना मात्र ते मनापासून आवडलेले, आणि हो, कोणत्याही प्रचारकाला कुठलेही कुटुंब कधीही हलकेसलके काम सांगून अपमानित करीत नाही याउलट मग तो स्वयंसेवक असेल अथवा प्रचारक किंवा एखादा आश्रित, संघ कुटुंब येणाऱ्या प्रत्येकाला प्रसंगी स्वतः उपाशी राहून पदरमोड करून त्यांची मनोभावे सेवा करण्यात धन्यता मानते, गोखले ना तुम्हाला ब्राम्हण समजले ना तुम्हाला संघ समजला…..

हिंदुत्व राष्ट्रप्रेम राष्ट्रसेवा राष्ट्र प्रगती शिक्षण याच पद्धतीचे सतत सकारात्मक विचार डोक्यात ठेवणारे अत्यंत सुशिक्षित विचारवंत आपले ब्राम्हण त्यांची बुद्धी जगातला एकही भ्रष्ट करणारा मायका लाल अद्याप जन्माला यायचा आहे त्यामुळे ब्राम्हणांची बुद्धी भ्रष्ट करण्याचे पाप संघाच्या खात्यावर जाते तुमचे हे सांगणे तद्दन मूर्खपणाचे. ब्राम्हण संघाच्या नादी अजिबात लागलेले नाहीत याउलट अतिशय विपरीत वातावरण असतांना गांधी नेहरूंमुळे धोक्यात आलेले हिंदुत्व आणि लबाड पाक विचारांच्या मुसलमानांना डोक्यावर घेण्याचे त्यांचे जिना प्रयोग, त्यावर तोडगा उपाय आणि दूरगामी विचार त्याकाळी ब्राम्हणांच्या डोक्यात आला त्यातून ब्राम्हणांनी संघ जन्माला घातला त्यामुळे ब्राम्हण संघाच्या नादी लागले पेक्षा संघाने देशातल्या जगातल्या समस्त हिंदूंना वेळीच सावध करण्याची त्यांना एकत्र आणण्याची फार मोठी भूमिका संघातल्या ब्राम्हणांनी समस्त संघ स्वयंसेवकांनी आजतागायत निभावली पुढे नेली. तरुणांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या विषवल्लीला आपल्या घरात मनात बिलकुल स्थान देऊ नका, तुमचे हे लिहिणे, एखाद्या ब्राम्हणांच्या लेखणीतून बाहेर पडणे अशक्य, मला तर तुमच्या आडनावात काहीतरी खोट आहे, हेच सतत जाणवते आहे. मला तुमचा पत्ता द्या, भेटायचे आहे…

अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी

Fri Sep 13 , 2024
– आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी मुंबई :- शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!