घरफोडी व वाहन चोरीचे ०२ गुन्हे उघडकीस

नागपूर :- पोलीस ठाणे कळमणा हद्दीत वैभव लक्ष्मी नगर, पेट्रोल पंप मागे, कळमणा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मोहम्मद अरशी मोहम्मद शरीक वय २६ वर्ष हे आपले घराला कुलूप लावुन पत्नीला तिचे माहेरी मोमीनपूरा येथे सोडून स्वतः मावशीचे घरी मुक्कामी राहण्यास गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराने कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून, घरातील लाकडी व लोखंडी आलमारीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख १,००,०००/- रू असा एकुण २,८५,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कळमणा येथे अज्ञात आरोपीविरूध्द्र कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ ये अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीवरून तसेच, तांत्रीक तपास करून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले, त्यांना विचारपूस केली असता त्यांनी संगणमत करून वरील घरफोडी केल्याची कबुली दिली, त्यांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी दिनांक २६.०७.२०२४ रोजी पोलीस ठाणे कळमणा हद्दीतून अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ झेड ९९५३ चोरी केल्याची कबुली दिली. विधीसंघर्षग्रस्त बालकांचे ताब्यातुन रोख १,४००/-रु., व अॅक्टीव्हा गाडी किंमती अंदाजे ५०,०००/- रू ची असा एकुण ५१,४००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नमुद दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालक हे पोलीस ठाणे कळमणा येथील इतर तिन गुन्हयात व पोलीस ठाणे यशोधरानगर येथील दोन व पोलीस ठाणे पारडी येथील एक अशा एकूण ०६ घरफोडीचे गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. विधीसंघर्षग्रस्त बालकांना मुद्देमालासह पुढील तपासकामी कळमणा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. मुकुंद ठाकरे, पोउपनि, मधुकर काठोके, सफौ. सतिश पांडे, दशरथ मिश्रा, पोहवा, विजय श्रीवास, संतोष ठाकुर, पोअं. जितेश रेड्डी, दिपक दासरवार, दिपक लाकडे, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणुक करणाऱ्या तिन आरोपींना अटक

Wed Jul 31 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे गणेशपेठ हहीत, बी/७, राहुल कॉम्प्लेक्स नंबर १, एसटी स्टॅण्ड चौक, गणेशपेठ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी शैलेन्द्र कृष्णभुषन चौधरी, वय ५१ वर्षे यांनी जुडीओ (ट्रेन्ट लिमीटेड) टाटा इंटरप्राईजेसचे स्टोअर टाकण्याकरीता जुडीओच्या वेबसाईटवर अर्ज केलेला होता. आरोपींनी संगणमत करून बनावट मेल आयडी तयार करून त्याद्वारे फिर्यादीला बनावट फार्म पाठविला व फिर्यादीकडून रजिस्ट्रेशन तसेच ईतर प्रक्रीयेकरीता फिर्यादी कडुन वेळो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com