नागपूर :- फिर्यादी अश्विन प्रभुदास दक्षीणी वय ५०, रा. सिझर अपार्टमेंट, फ्लॅट नं. ११, राम मंदीर गल्ली, महाल, नागपूर यांचे नविन घराचे बांधकाम पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत प्लॉट नं. ३२५ बाबुलबन पाण्याचे टाकीजवळ, लकडगंज नागपूर येथे सुरू असुन त्यांनी बांधकामाकरीता लागणारे ईलेक्ट्रीकचे साहित्य ठेवून कुलूप लावून घरी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून घरात ठेवलेले नॉलटेक कंपनीचे ईलेक्ट्रीक वायर २४८ नग एकूण किमती ८०,००० रु चा मुद्देमाल चोरून नेला. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे लकडगंज येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भादवि अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट क. २३ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून सापडा रचुन आरोपी १) योगेश उर्फ लक्की रमेश शाहु, वय २५ वर्ष, रा. काशीबाई देऊळ कोतवाली, नागपुर यास ताब्यात घेवुन त्यांची विचारपुस केली असता, आरोपींनी वर नमूद गुन्हा पहीले आरोपी (२) संतोष मातादीन शाहु, वय ३८ वर्ष, न्यू बिनाकी मंगळवारी, कांजी हाउस चौक, यशोधरानगर याचे सोबत मिळून केल्याची कबुली दिली. आरोपीला सदर गुन्हयात अटक करून त्यांची अधिक चौकशी केली असता, आरोपीने १) पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत ईलेक्ट्रीक वायरचे १०० बंडल चोरी केल्याचे २) पोलीस ठाणे अजनी हद्दीतून ईलेक्ट्रीक वायरचे १८ बडल चोरी केल्याचे ३) पोलीस ठाणे नवी कामठी हद्दीतून ईलेक्ट्रीक वायरचे २० बंडल चोरी केल्याचे (४) पोलीस ठाणे प्रतापनगर हदीतून ईलेक्ट्रीक वायरचे २४ बंडल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातून वर नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १) तांबा धातुचा जाळून गळवीलेला तार एकून वजन १०८ किलोग्रम किंमती अंदाजे १,०२,६०० रु. चा मुद्देमाल व २) अॅक्टीव्हा गाडी कमांक एम एच ३१ नंबर असलेली पुर्ण नंबर नाही कि. अं. ८०,०००रु. ३) नोकीया कंपनीका की पॅड मोबाईल किंमती १००० रु. असा एकून रु. १,८३६००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी कडुन एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणलेले आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई करीता पोलीस ठाणे लकडगंज येथे ताब्यात देण्यात आले. पाहिले आरोपी याचा शोध सुरू आहे. नमुद कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शना खाली वपोनि महेश सामडे, सफी. कोरडे, पोहवा अनिल जैन, मुकेश राउत, प्रविण लाड नापोल अनुप तायवाडे, अमोल संतोष चौधरी यांनी केली.
घरफोडी व चोरी करणाऱ्या ०२ आरोपींना अटक, ०५ गुन्हे उघडकीस.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com