अमरदिप बडगे , प्रतिनिधी
गोंदिया – जिल्हातील तिरोडा तालुक्यात कवलेवाडा येथे मुलंचद तुरकर , शोभेलाल तुरकर, प्रभू पारधी नत्थूटोली यांच्या जोरदार झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे घरे पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला असून अनेक भागातील घरांची छत उडाली, तर काही घरांच्या भिंती कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी करताना किरण पारधी जिल्हा परिषद सदस्य,पिंटु चौधरी पंचायत समिती सदस्य,तलाठी नागदेव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा तयार केले आहे. यावेळी धनराज बोबडे , अजाब भोयर भुमेश्वर पारधी,विजय राणे, उमेश बोबडे, व्यंकट महादुरकर, मोतीराम बावनकर, मोरेश्वर येरखेडे उपस्थित होते. नुकसानग्रस्त नागरिकांना अन्न धान्य व घरकुल योजना देण्यात यावी. अशी मागणी नागरिकांनी केली. जिल्हा परिषद कवलेवाडा क्षेत्रातील अन्य गावांना सुध्दा भेटी देण्यात आल्याचे जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांनी सांगितले.