नागपूर :-झिरो माईल युथ फाउंडेशन तर्फे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदद्वारा आयोजित राष्ट्रीय एकात्मता यात्रेच्या माध्यमातून नागपूर शहरात आलेल्या पूर्वोत्तर राज्यातील प्रतिनिधींचे झीरो माईल मेट्रो स्टेशन वर स्वागत करण्यात आले.
“स्टूडेंट्स एक्सपीरियंस इन इंटर- स्टेट लिविंग” (S.E.I.L) म्हणजेच आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे सन 1966 पासून दर वर्षी पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थ्यांना इतर वेगवेगळ्या राज्यात व इतर राज्यातील विद्यार्थ्यांना पूर्वोत्तर राज्यात पाठवून तेथील संस्कृतीची माहिती व स्थानिक जीवन अनूभवण्यास मदत करते. यावर्षी सुद्धा सील राष्ट्रीय एकात्मता यात्रा अंतर्गत पूर्वोत्तर राज्यातील 480 प्रतिनिधीं इतर राज्यात आलेले असून त्यातील एक ग्रुप नागपूर शहरात आलेला असून त्यांचे स्वागत झिरो माईल युथ फाउंडेशन नागपूर तर्फे झिरो माईल मेट्रो स्टेशनवर उच्च शिक्षण सह-संचालक नागपूर विभाग संजय ठाकरे, अभाविप प्रांत संघटन मंत्री विक्रमजित कलाने, राजदीप इंटरप्राइजेस चे विश्वजित बरगे व समर सिंग यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आले. यावेळी झिरो माईल युथ फाउंडेशन ची माहिती प्रतिनिधींना देण्यात आली,यावेळी झिरो माईल फाउंडेशनचे समय बनसोड, प्रशांत कुकडे,कल्याण देशपांडे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन वैभव बावनकर यांनी केले.