संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जगद्गुरु संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांना बीज दिनानिमित्त स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे कामठी विधानसभा विश्वकर्मा योजना प्रमुख अमोल नागपुरे , दिव्यांग फाऊंडेशन चे सचिव बाॅबी महेंद्र , यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा पराग सपाटे यांनी” तुकाराम महाराज बीज ” या विषयावर माहिती सांगितली. व या बीज दिनी संत तुकाराम महाराज यांना विनम्र अभिवादन करावे दिनाच्या शुभेच्छा देऊ नये असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. सूत्रसंचालन हिमांशू लोंडेकर तर आभार अक्षय खोपे यांनी केले. याप्रसंगी दिनेश पठाडे , जतिन शंभरकर उपस्थित होते.