संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांना कळवा या हेतूने दिवाळीनिमित्त शिवकालीन किल्ला स्पर्धेचे आयोजन युवा चेतना मंच कामठी तर्फे कामठी तालुका मध्ये करण्यात आले होते . या स्पर्धेचे पुरस्कार वितरण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक कामठी येथे सी आर पी एफ चे निवृत्त सैनिक शेषराव अढाऊ , ऑलम्पिकचे स्वर्ण पदक विजेता मेजर अक्रम खान , नगरसेवक प्रतिक पडोले , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाहक मुकेश चकोले , नित्य पूजन समितीचे समन्वयक अनिल गंडाईत, नागपूर जिल्हा कामगार मजूर संघटनेचे सचिव हितेश बावनकुळे, दिव्यांग फाउंडेशनचे सचिव बॉबी महेंद्रा , सामाजिक कार्यकर्ता अशोक ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले . याप्रसंगी नित्यपूजन समितीतर्फे महाराजांची विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत छत्रपती नगर कामठी येथील प्रतीक पडोळे यांच्या नेतृत्वाखालील चमुने तयार करण्यात आलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला प्रथम पुरस्कार तर येरखेडा येथील टीचर्स कॉलनी येथील मनोज बडवाईक यांच्या नेतृत्वाखालील तयार करण्यात आलेल्या किल्ला प्रतिकृतीला द्वितीय पुरस्कार तर दुर्गा चौक कामठी येथील मॅक्झिन कम्प्युटर जवळील मुकेश चकोले यांच्या नेतृत्वाखालील किल्ल्याला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले . सर्व चमुला शिवकालीन शिवाजी महाराजांची राजमुद्रा व प्रशस्तीपत्र- सम्मानपत्र प्रदान करण्यात आले . तर सोबतच भूषण नगर रनाळा येथील डॉ निखिल अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली चमूला व साईबाबा कॉलनी कॅन्ट परिसरातील नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील चमुला प्रोत्साहनपर सन्मान प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले . याप्रसंगी नगरसेवक प्रतीक पडोळे यांना वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रदान करण्यात आली. पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन शिव उत्सव प्रमुख मयूर गुरव यांच्या नेतृत्वात करण्यात आले. सहयोगी म्हणून कुणाल सोलंकी, भूषण ढोमणे , डॉ निखिल अग्निहोत्री यांनी कार्य केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पराग सपाटे तर आभार प्रदर्शन अक्षय खोपे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्रीकांत अमृतकर ,अमोल नागपुरे, नितीन ठाकरे ,नरेश सोरते , निखिल पाटील ,अक्षय भोगे, श्रीकांत मुरमारे, रुद्राक्षी बावनकुळे, रोहित तरारे, विजय टाकभवरे ,अल्केश लांजेवार ,सागर बिसने, सागर वाघमारे, बंटी पिल्ले, अविनाश वांदिले, हिमांशू भुरे , आदींनी परिश्रम घेतले.