Ø राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे 2 डिसेंबरला आयोजन
Ø 50 हजार उमेदवारांना रोजगारांची संधी
Ø 1 हजार कंपन्यांचा सहभाग
नागपूर :- राज्यातील बरोजगार युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा बेरोजगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी केले आहे.
कौशल्य विकास रोजगार मेळाव्या बाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त् विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, सहसंचालक देवतळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा या उदात्त संकल्पनेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज सभागृह येथ दिनांक 2 व 3 डिसेंबर 2023 रोजी येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे अयोजन करण्यात आले आहे.
महारोजगार मेळाव्यात 50 हजार बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. मेळाव्यामध्ये 1 हजार कंपन्यांचा सहभाग विविध क्षेत्रातील 50 हजार रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये खनीकर्म उद्योग, हॉस्पिटल उद्योग, मिहान, हिंगणा, बुट्टीबोरी, एमआयडिसी नागपूर यांचे स्टॉल उपलब्ध असणार आहे. तसेच स्वयंरोजगाराची माहिती देण्याकरिता विविध महामंडळाचे स्टॉल येथे लावण्यात येणार असून स्वयंरोजगार करण्यास इच्छुक उमेदवारांना याचा लाभ घेता येईल. या रोजगार मेळाव्यात प्लेसमेंट एजन्सीज चा सहभाग असणार आहे. राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याच्या संदर्भात अधिक माहितीसाठी तसेच आपले नाव नोंदविण्यासाठी www.Rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे.
स्टार्ट-अप सुरु करण्यास इच्छुक उमेदवाराकरिता कौशल्य विकास विभागांमार्फत स्टॉलवर माहिती उपलब्ध होणार आहे. या महारोजगार मेळाव्याचा जास्तीत-जास्त बेरोजगार युवक-युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन कौशलय रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.