भंडारा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत दरवर्षी युवा महोत्सवाचे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आयोजन करण्यात येत असते. सन 2024-25 यावर्षात संयुक्त राष्ट्र संघाने “विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना ” “Innovation in Science and Technology” हि संकल्पना दिलेली आहे.
या संकल्पनेवर आधारीत जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2024-25 चे आयोजन दि.02 डिसेंबर, 2024 रोजी पोलीस कल्याणकारी सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नरुल हसन, पोलीस अधिक्षक, हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. व त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकेतून लतिका लेकुरवाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, भंडारा यांनी कार्यक्रमाचा उद्देश व महत्व विशद केले. नरुल हसन, पोलीस अधिक्षक, यांनी उद्घाटनीय भाषणातून युवक हे देशाचा आधारस्तंभ असून राष्ट्र उभारणीस युवकांची भुमिका महत्वाची आहे,तरी युवकांनी शिक्षणाबरोबरच रोजगार क्रीडा व सांस्कृतीक क्षेत्रात नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाचा विकास करावा असे प्रतिपादन केले.
सदर स्पर्धेकरीता पंच म्हणून डॉ. राजेंद्र शहा, प्रा. भोजराज श्रीरामे, कार्तीक मेश्राम, प्रा. शाहिद अक्तर, डॉ. ज्योती नाकतोडे, डॉ. आम्रपाली भिवगडे, रेखा पटले, पुष्पा काटेखाये, प्रशांत वालदेव, राहुल हुमणे, अतुल गेडाम, रोहीत वाघ यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा उत्साही वातारणात संपन्न झाल्या असून विभागीय युवा महोत्सवाकरीता
1) समुह लोकगित गांधी विद्यालय कोंढा पवनी प्रथम
2) समुह लोकनृत्य गांधी विद्यालय कोंढा पवनी- प्रथम
3) कविता मेघा मिश्रा, जे. एम. पटेल महा. भंडारा
प्रथम
4) कथालेखन- लोकेश लोहबरे, ओम सत्यसाई परसोडी प्रथम
5) वकृत्य् – ओम फुंडे, गांधी विद्यालय कोंढा पवनी
6) फोटोग्राफी – डिंपल विजय कापगते प्रथम
7) चित्रकला तन्मय केशव येलमुले, गांधी विद्यालय पहेला
8) सायन्स मेला प्रदर्शन (सांघीक) महिला समाज भंडारा यांची चमू
9 सायन्स मेला प्रदर्शन वैयक्तीक सुलोचनादेवी पारधी विद्या.
मोहाडी याची निवडण झाली असून विजयी संघ कलाकारासंना जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे,यांनी शुभेच्छा दिल्या.युवा महोत्सवाचे संचालन रोहीत वाघ,तर आभार प्रदर्शन रमेश अहीरकर,यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आकाश गायकवाड,की. अ. निखिलेश तभाने,की.अ. पराग गावंडे,प्रतिक लाडे,प्रविण देसाई,राजेंद्र सावरबाधे,सुरज लेंडे,सुधिर गळमळे,अतुल गजभिये,रामभाऊ धुडसे,यांनी विशेष परिश्रम घेतले.