संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सिटी हॉस्पिटल येथे विषारी औषध प्राशन केल्यासंदर्भात उपचारार्थ दाखल असलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री 1 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव सुनील गदरीये वय 36 वर्षे रा गहूहिवरा रोड,संजीवनी नगर कन्हान असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर मृतक तरुणाने काल रात्री साडे नऊ दरम्यान सेलफॉस नावाचे विषारी औषध प्राशन केल्याने उपचारार्थ तडकाफडकी कामठी येथील सिटी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान सदर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर मृतकाने विषारी औषध प्राशन केल्याचे कारण हे अजूनही अनुत्तरित आहे.