– रामझूल्यावर मध्यरात्रीनंतर अपघात: प्रकरण दाबण्याचे प्रयत्न
– पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह
नागपूर :- वेगाच्या नशेत नियमांची पर्वा न करता मध्य रात्री
धनाढ्या घरातील दोन महिला कार चालकांनी दुकाची स्वार दोन तरुणांना मागून धडक देत पळ काढला या मध्ये त्या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया असे तरुणांना चे नाव आहे.
दोन तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले ल्या दोन महिलांना 4,5 दिवस उलटून सुद्धा कोणती ठोस कारवाई केली गेली नाही.वेगळे वेगळे शिस्त मंडळ सुद्धा पोलीस प्रशासन ला उत्तर मागत आहे का इतक्या दिवसा नंन्तर सुद्धा कार्यवाही झाली नाही याचा विरोध म्हणून युवक काँग्रेस ने आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला.आली कडे नागपूर शहरात गुन्हेगारी अति जास्ती प्रमाणात वाढली आहे गुन्हे वाढत चालले आहे.
गुन्हेगारांन वर नियंत्रण आहे कि नाहीं असा प्रश्न सुद्धा जनतेला पडला आहे..
अखिल भारतीय युवा काँग्रेस के महासचिव ऋषिकेश (बंटी) बाबा शेळके आणि शहर अध्यक्ष तौसिफ़ खान यांच्या मार्गदर्शन मध्ये तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव मोईस खान आणि सागर चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.
आंदोलनात स्वप्नील ढोके,अमन लुटे, कुणाल खडगी,संजू जवादे, सलीम शाह, शोएब अन्सारी, अभिषेक गाणार, अभिषेक डेंगरे,अरिफ खान,राहिल भगत आदी कार्यकर्ता, पाधिकारी उपस्तिथ होते