तरुणाची गळफास लावून आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया गोदाम येथे एकूलत्या एक मुलाने घरात कुणी नसल्याचे संधी साधून राहत्या घरातील छताच्या लोखंडी हूक ला साळीने गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना काल रात्री 8 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव शुभम ढोके वय 30 वर्षे रा नया गोदाम कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा घरी एकटाच असल्याने घरी कुणी नसल्याचे संधी साधून अज्ञात कारणावरून गळफास लावून आत्महत्या केली. घरमंडळी घरी परतले असता दार आत मधून बंद असून दार कुणीही उघडत नसल्याने शेजारील मंडळींच्या मदतीने दार उघडले असता आत्महत्या केल्याचे दृश्य बघताच एकच धक्का बसला. यासंदर्भात पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर श्वविच्छेदनगृहात शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गाईच्या कोठयातुन वासराची बिबट्याने केली शिकार

Wed Jun 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – वनविभागाने बिबट्याचा ठोस उपाययोजना करून शेतक-यास नुकसाव भरपाई देण्याची मागणी केली.  कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील येसंबा (नांदगाव) गावा लगत गाईच्या कोठयातुन पहाटे निखिल गोपाल गि-हे या शेतक-याच्या शेतातील गाईच्या कोठयातुन पाळीव गाईचा ६ माहिन्याच्या बासरास बिबट्याने शिकार करून फस्त केल्याने गावात व परिसरातील अनेक गावातील शेतकरी व गो पालक भयंकर चिंतेत आहे. येथील ग्रामस्थांमध्ये बिबट्याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com