तरुणाची गळफास लावून आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधी नगर परिसरातील 38 वर्षीय विवाहित तरुणाने घरात कुणी नसल्याचे संधी साधून अज्ञात कारणावरून घरातील छताच्या लोखंडी हुकला ओळणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली असून मृतकाचे नाव भारत खुशाल गजभिये वय 38 वर्षे रा गांधी नगर कामठी असे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतकाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.आत्महत्याचे कारण अजूनही कळू शकले नसून पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यु, इतर दोन जख्मि

Mon Feb 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर जबलपूर महामार्गावरील कामठी येथील प्रबुद्ध नगर जवळील महादेव डेली निडस समोरून नागपूर हुन नागसेन नगर स्वगृही भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकी क्र एम एच 40 सी एन 5929 च्या स्वाराने समोरील दुचाकी ला ओव्हरटेक करण्याच्या बेतात दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या गंभीर अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com