संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सिटी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी 10 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव योगेश वानखेडे वय 22 वर्षे रा खंडाळा(कन्हान)असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक तरुणाने काल दुपारी 2 दरम्यान आपल्या घरातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता घरमंडळींनी त्वरित मदतीची धाव घेत कामठी येथिल सिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.मात्र उपचारा दरम्यान सदर तरुणाचा मृत्यू झाला.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक घटनेची नोंद करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवून मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.