तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे आता जोमाने तयारीला लागा – शरद पवार

मुंबई :- तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा असा वडीलकीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

आज एमपीएससीने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एमपीएससी परीक्षेसाठी नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत त्यांची शरद पवार यांनी मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजता भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला होता.

एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल असा विश्वास व्यक्त करतानाच शरद पवार यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! दिल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कला ही भाषिक विविधता आणि प्रादेशिक वैशिष्ट्ये एकाच धाग्यात गुंफते : राष्ट्रपती मुर्मू

Fri Feb 24 , 2023
नवी दिल्ली :-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (23 फेब्रुवारी 2023) नवी दिल्ली येथे वर्ष 2019, 2020 आणि 2021 साठी संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती (अकादमी रत्न) आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान केले. मानवी सभ्यता किंवा संस्कृती एखाद्या राष्ट्राची भौतिक कामगिरी दर्शवते परंतु अमूर्त वारसा त्याच्या सांस्कृतिक वारशातूनच प्रकट होतो.  सांस्कृतिक वारसा हीच देशाची खरी ओळख असते.  भारताच्या अनोख्या सादरीकरण कलांनी शतकानुशतके […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!