तरुणींनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या गावाचा नावलौकिक करावा – ठाणेदार दीपक भिताडे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी –  स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील तरुणींनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन सुप्त गुणाचे प्रदर्शन करून आपलं व आपल्या गावाचं नावलौकिक करण्याचे आव्हान जुनी कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे यांनी रेणुका क्रीडा मंडळ अजनी च्या वतीने आयोजित ओपन गट महिला कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले रेणुका मंडळ अजनी च्या वतीने प्रति वर्षानुसार यावर्षी सुद्धा महिलांच्या ओपन गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जुनी कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे यांचे हस्ते दीप प्रज्वलन छत्रपती शिवाजी महाराज, वीर बजरंग बली ,क्रीडांगणाची पूजा व खेळाडूचा परिचय करून करण्यात आले यावेळी माजी आमदार देवराव रडके ,माजी जिल्हा परिषद सदस्य भगवतराव रडके, माजी सभापती उमेश रडके, मंडळाच्या अध्यक्षा अवंतिका महेश महाजन, मुख्य आयोजक राहुल शेळके, डॉक्टर विजय रडके पोलीस पाटील बलवंत रडके सरपंच संजय जीवतोडे ,उपसरपंच हेमराज दवंडे ,नरेश जीवतोडे, दिनेश मेश्राम, घनश्याम चकोले मामा, उमेश मस्के, भारती वाट ,कविता डोरलीकर, महिमा चौधरी ,अलका शेळके, प्रियंका उकेबोंद्रे, शालू वैद्य, विनोद वाट, धीर पांडे ,गजेंद्र वाढ, लीलाधार दवंडे, शंकर भोयर ,गणपत झलके ,अमित ठाकूर, दीपक नारनवरे उपस्थित होते कबड्डी स्पर्धेत विदर्भातील दिग्रस, अमरावती ,वर्धा, चंद्रपूर ,यवतमाळ ,भंडारा ,नागपूर जिल्ह्यातील नामवंत क्रीडा मंडळ सहभागी झाले आहेत विजयी प्रथम ,द्वितीय, तृतीय संघास रोख पुरस्कार व शिल्ड प्रदान करण्यात येणार आहे याव्यतिरिक्त वुमेन ऑफ द सिरीज, वुमेन ऑफ द मॅच ,बेस्ट रेडर, असे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल शेळके बाबा यांनी केले संचालन लीलाधर दवंडे व आभार प्रदर्शन घनश्याम चकोले मामा यांनी मांनले, कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

निराधार महिलेस राशनकार्ड प्रदान..

Mon Apr 10 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी प्रतिनिधि 9 एप्रिल – आनंद नगर कामठी येथील अत्यंत गरीब महिला जिच्या कडे घरा च्या नावावर चार टिनपत्रे,ना घर टैक्स बिल, ना आधार कार्ड, ना राशन कार्ड, ना लाईट बिल, ना बैंकेत जनधन खाता आहे ,ती चार घरी पडेल ते काम करून मजदूरी करुन उदरनिर्वाह करते तिला नुकतेच राशन कार्ड देण्यात आले . कोठारी गैस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com