वीज पडण्यापूर्वीच मोबाईल वर मिळणार अलर्ट

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-‘दामिनी’ऍप वापरण्याचे आवाहन

कामठी :- पावसाळा सुरू झाला असून पावसाळयात विजांचा कडकडाट होणे नैसर्गिकच आहे बहुतांशवेळी ह्या विजा कोसळत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो .विशेषतः शेतकरी,मेंढेपाळ यांना शेतात ,जंगलात उघड्यावर वीज वारा यांचा सामना करावा लागतो आणि वीज कोसळल्याने मृत्यू होण्याच्या घटना घडतात हे टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या भूविज्ञाण मंत्रालयाने दामिनी ऐप तयार केले आहे.त्यामुळे मान्सून कालावधीत वीज पडून होणारी होणारी जीवित हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी विशेषतः दामिनी ऐप वापरण्याचे आवाहन कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.हे दामिनी ऐप मोबाईलवर डाउनलोड केल्यास वीज पडण्यापूर्वी मोबाईलवर सूचना मिळते त्यामुळे हे ऐप आता वरदान ठरणार असून या ऐप मध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या 15 मिनीटापूर्वीच स्थिती दर्शविण्यात येते.

-प्ले स्टोअर वरून करा दामिनी डाउनलोड

– दामिनी ऐप गुगल प्ले स्टोअर द्वारे HTTPS://google.com/stcc/apa/details shivam.lighting.live.damini या लिंकवरून डाउनलोड करता येणार आहे.हे ऐप आपल्या सभोवतालच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे .यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपाकडुन कलंकित उद्धव ठाकरें विरोधात भव्य आंदोलन, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून नोंदवला निषेध!

Wed Jul 12 , 2023
नागपूर :- नागपुरचा चेहरामोहरा बदलून नागपुरचा विकास करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत त्यांना नागपुरचा कलंक म्हणणारे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या विरोधात आज व्हेरायटी चौक नागपूर, येथे भाजपा नागपुर महानगराच्यावतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजयुमो कडुन झाशीराणी चौकातुन उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्यांसोबत परिसरातील नागरिकांनी देखील ‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com