योगाभ्यासी मंडळाचा रथ सप्तमी उत्सव

नागपूर :- उत्तरायणाच्या सुरुवातीच्या रथ सप्तमी दिवसाचे अनन्य साधारण महत्व मंडळाच्या योग साधकांना आहे. जगपालक सूर्य नारायणाचे महत्व सनातन हिंदू धर्मात पुरातन काळापासून आहे आणि योगाभ्यासात सूर्य नमस्कारांचे महत्व मंडळाचे दैवत प. पू. जनार्दन स्वामींनी अधोरेखित करून अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीने सूर्य नमस्कार कसे घालवेत याचे सविस्तर शास्त्रीय वर्णन एका छोट्याश्या चार्ट मध्ये बसवून तो अत्यंत लोकप्रिय केला आहे. ह्या शिवाय सूर्यनमस्कारांमध्ये भुजान्वासन ह्या आसनाचा समवेश करून वयस्कही न थकता 12 नमस्कार घालू शकतील याची सोय केली.

दिनांक 28 जानेवारी रोजी सर्व योगकेंद्रांचे साधक सिव्हिल लाईन्स येथील चिटनवीस सेंटरच्या योग केंद्राच्या भव्य प्रांगणात सकाळी 6 पासून रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार घालून सूर्यदेवतेला आदरांजली वाहण्यासाठी जमू लागले. ठीक 6.54 ला सूर्योदयाला उपस्थितांकडून शास्त्रशुद्ध व समंत्र 12 सूर्य नमस्कार करवून घेतल्या गेले. त्याचवेळी 70 साधकांनीही सांघिक रीत्या एका विवक्षित जागेत 144 नमस्कार घालण्यास सुरुवात केली.

सूर्यनमस्कार झाल्यानंतर श्याम देशपांडे आणि नमिता बांगरे यांनी अत्यंत सुरेल स्वरात आदित्य हृदय स्तोत्र गायले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीपक खीरवाडकर, संचालक दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र यांनी सर्व साधकांचे अभिनंदन करून मंडळाच्या त्यांच्या केंद्रातही चालू असलेल्या योगवर्गाची माहिती दिली. मंडळाचे अध्यक्ष खांडवे गुरुजींनी ओजस्वी शब्दात यथायोग्य उदबोधन करून साधकांचे कौतुक केले. तिळ गुळाचा प्रसाद व दुधाचे वितरण होऊन कार्यक्रम समाप्त झाला.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रेसिडेंट कप 2.0 डीपीएस मिहानमध्ये सुरू 

Wed Feb 1 , 2023
नागपूर :- टेनिस बॉल क्रिकेटमधील प्रतिष्ठित राष्ट्रपती चषकाची दुसरी आवृत्ती शुक्रवार, 27 जानेवारी 2023 रोजी दिल्ली पब्लिक स्कूल मिहानच्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली होती. गुरुदास राऊत, आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट खेळाडू, T20 विश्वचषक 2019 चे कर्णधार आणि प्राप्तकर्ता BCCI, ICC आणि VCA द्वारे स्थापित केलेल्या अनेक पुरस्कारांनी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी फिजिकली चॅलेंज्ड क्रिकेट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com