योग ही जीवन पद्धती सर्वांनी अंगिकारणे गरजेचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- निरोगी शरीरासाठी योग खूप महत्त्वाचा आहे. योग ही जीवनपद्धती आहे ती जर सर्वांनी अंगिकारली तर नक्कीच सुदृढ नागरिक घडू शकतात. सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती असते, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह योगा इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक ऋषी जयदेव योगेंद्र यांच्यासह इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, योगचा प्रचार व प्रसार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे. योग जीवनशैलीमुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होते त्यामुळे प्रत्येकाने दररोज योग करणे गरजेचे आहे. शरीर आणि मन जोडण्याचे काम योग करते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी अर्धा तास चालेल्या योग सत्रात मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, राज्य उत्पादन शुल्कचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा प्रधान सचिव मनीषा वर्मा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

येत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

Fri Jun 21 , 2024
मुंबई :- मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रदूषणात वाढ होत असल्याने यावेळी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली. यामुळे मुंबई शहर प्रदूषणमुक्त होवू लागले आहे. येत्या दोन वर्षात मुंबईचा चेहरा बदलण्यासाठी सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. मेट्रो आणि कोस्टल रोडमुळे मुंबईतील प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पद्मश्री नाना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com