– सतीश कुमार ,गडचिरोली
महिला दिन, महिला मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा सन 2021-2022
गडचिरोली,(जिमाका)दि.08: आज प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर स्त्री आहे. पण तरीही स्त्रियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. आजच्या स्त्रीने आत्मनिर्भर बनले पाहिजे आणि निर्भयपणे संकटांचा सामना केला पाहिजे. कारण पुढची पिढी कशी घडवायची हे महिलांच्याच हातात आहे. त्यासाठी येणार्या उज्ज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता महत्त्वाची असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी प्रतिपादन केले. ते महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली व्दारा आयोजित कार्यक्रमात नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, गडचिरोली येथील सभागृहात महिला दिन, महिला मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमात बोलत होते. सदर कार्यक्रम मनोहर पाटील पोरेटी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संजय मीणा (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे शुभहस्ते पार पडले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, आर.एम. भुयार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, श्रीमती रोषनीताई सुनिल पारधी सभापती, म. व बा. क. समिती, जिल्हा परिषद, गडचिरोली, श्रीमती रंजिताताई कोडापे, सभापती, समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद, गडचिरोली, श्रीमती वाय.एम. भांडेकर, सदस्य, म.व बा. क. समिती, जिल्हा परिषद, गडचिरोली, श्रीमती रुपाली पंदीलवार, सदस्य, जिल्हा परिषद, ॲङ रामभाऊ मेश्राम, सदस्य, जिल्हा परिषद, श्रीमती एम.एम. डोनाडकर, सदस्य, म.व बा. क. समिती, जिल्हा परिषद, गडचिरोली, श्रीमती एन. जी. ढोरे, सदस्य, म.व बा. क. समिती, जिल्हा परिषद, गडचिरोली, श्रीमती आर.एस. अनोले, सदस्य, म.व बा. क. समिती, जिल्हा परिषद, गडचिरोली, फरेन्द्र कुतिरकर, उपमुख्य काय्रकारी अधिकारी (सा.प्र.), श्री. भांदककर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्रीमती आत्राम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, श्री. तुरकर, कार्यकारी अभियंता (ग्रापापु.) व श्रीमती ए. के. इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.), जिल्हा परिषद, गडचिरोली हे उपस्थित होते.
सदर कायक्रमाचे संचालन श्रीमती लाडके, बा.वि.प्र.अ. देसाईगंज व आभार प्रदर्शन गणेश कुकडे, बा.वि.प्र.अ., कुरखेडा यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमाला जिल्हयातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि जिल्हा परिषदेचे समस्त अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
उपरोक्त महिला दिन कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून 15 वित्त आयोग निधीतून अंगणवाडीतील SUW, MAM, SAM चे बालकांना विशेष आहार दि. 2 ऑक्टोंबर, 2021 पासून देण्यात येत आहे. सदर आहारामुळे जिल्हयातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याकरिता प्रकल्पस्तरावरील उत्कृष्ट कार्य केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिस, अंगणवाडी पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकारी यांना एकूण 52 सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी महोदयांनी असेच चांगले कार्य करुन जिल्हा कुपोषणमुक्त करण्याबाबत शुभेच्छा दिल्या असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.