जागतिक व्याघ्र दिन सुरेवानी पेंच येथे साजरा.

नागपूर/सावनेर – 29 जुलै जागतिक व्याघ्र दिनानिमित्त, 30 जुलै 2023 रोजी धनेश पर्यंटन संकुल ,सुरेवाणी, नागलवाडी रेंज, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर,महाराष्ट्र येथे व्याघ्र दिन साजरा करण्यात आला.

वाघांच्या संवर्धनासाठी 80 हून अधिक जणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यात अभाविप चे सदस्य, विद्यार्थी, पालक व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

परिक्षेत्र वनाधिकारी  प्रवीण लेले यांनी पेंच बफर क्षेत्राचे निरीक्षण व्यवस्थापन आणि जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचे महत्त्व याविषयी संबोधित केले.

मानद वन्यजीव वॉर्डन आणि डब्ल्यूडब्ल्यूएफचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अजिंक्य भाटकर यांनी मानव-वन्यजीव संघर्ष आणि त्यासाठी करता येणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती दिली.

ग्रामीण वनसंस्थेचे सदस्य व अभाविप सावनेर चे अध्यक्ष अभिषेकसिंह गहरवार यांनी वाघाचे जीवन व अधिवास आणि वाघांच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व याविषयी सांगितले.

युवा वन्यजीव संशोधक श्रीकांत ढोबळे यांनी वाघांमधील वर्तणूक आणि संवाद याविषयी मार्गदर्शन केले.

यानंतर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नेचर वॉक, वृक्षारोपण आणि पक्षी निरीक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात आले. नागलवाडी परिसरातील स्थानिक समाज बांधव, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य, विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावत या कार्याला पाठिंबा दिला.

कार्यक्रमाचे संचालन अभिषेकसिंह गहरवार यांनी केले तर आर एफ ओ  प्रवीण लेले यांनी आभार प्रदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता तीन ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार - कृषिमंत्री धनंजय मुंडे

Mon Jul 31 , 2023
मुंबई :- पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com