• काल वटपौर्णिमा ऑन व्हील्स धुमधडाक्यात साजरी झाली
• पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महिलांनी केली मेट्रो सफर
नागपूर :- रोकडे ज्वेलर्स आणि श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने काल 3 जून रोजी सकाळी 11.30 वाजता ‘वटपौर्णिमा ऑन व्हील’ हा धावत्या माझी मेट्रो ट्रेन मध्ये अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर एकत्र जमत महिलांनी आधी वाडाच्या झाडाचे वाण देत, आणि पर्यावरण संवर्धनाची शपथ घेत कार्यक्रमाला सुरुवात केली. या कार्यक्रमात दोनशे महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर सीताबर्डी ते लोकमान्य नगर या मार्गिकेवर धावत्या मेट्रोतून महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सफर केली. यावेळी ”सन मराठी” चॅनलचे निवेदक आणि विनोदी अभिनेते आशिष पवार ह्यांनी विविध खेळ आणि विविध स्पर्धांचे आयोजन करून धमाल आणली. ह्यातील विजेत्या महिलांना रोकड़े ज्वेलर्स ,लक्ष्मीनगर येथे नऊवारी साडी आणि रोकड़े ज्वेलर्स चा संचालिका संस्कृति रोकडे यांचा हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.. वटसावित्री पौर्णिमा उत्सवानिमित्त या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून एक सकारात्मक संदेश महिलांपर्यंत पोचवण्याचा उत्तम प्रयत्न केला गेला.
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी महिलांना वटवृक्षाच्या रोपांचे वाटपाकरण्यात आला.. या कालावधीत होणाऱ्या स्पर्धांचे सूत्रसंचालन सन मराठी,कॉमेडी एक्सप्रेस फेम प्रसिद्ध निवेदक आशिष पवार ह्यांनी धमाल केले. सृजन आणि संस्कृतीचा हा सण अविस्मरणीय बनवण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी ‘वटपौर्णिमा ऑन व्हील्स’ अशा कार्यक्रमाचे आयोजन पुन्हा पुन्हा करण्यात यावे अशी मागणी महिलांनी केली. माझी मेट्रो नागरिकांना सुरक्षित, किफायतशीर, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सेवा देत आहे. कार्यक्रमादरम्यान शहरातील रुळांवरून धावणाऱ्या मेट्रो ट्रेनमध्ये पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम अनुकरणीय असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.