केंद्रीय भूजल मंडळ, नागपूरद्वारे ‘राष्ट्रीय जलस्रोत मॅपिंग आणि व्यवस्थापन’ विषयावर कार्यशाळा संपन्न  

नागपूर :- केंद्रीय जलशक्ती मंत्रालया अंतर्गत नागपूरच्या केंद्रीय भूजल मंडळ, मध्य क्षेत्र नागपूर (सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड) यांच्या कार्यालयाद्वारे तसेच लखनऊ येथील उत्तर क्षेत्र, छत्तीसगड येथील उत्तर मध्य क्षेत्र, तसेच जलशक्ती मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या चिटणवीस सेंटर येथे एक दिवसीय राष्ट्रीय जलस्रोत मॅपिंग आणि व्यवस्थापन अर्थात नॅशनल अ‍ॅक्वीफर मॅंपींग़ अ‍ॅंड मॅनेजमेंट प्रोगाम -‘एनक्वीम’ क्षेत्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला केंद्रीय भूजल मंडळाचे फरीदाबाद मुख्यालयाचे अध्यक्ष सुनील कुमार, केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे सदस्य ए. के. अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . या कार्यशाळेला अध्यक्ष, निमंत्रक म्हणून केंद्रीय भूजल मंडळ, मध्य क्षेत्र नागपूरचे प्रादेशिक संचालक एन. वरदराज तर मुख्य अतिथी म्हणून नागपूर आयुक्तालयाच्या विकास विभागाचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे उपस्थित होते. देशातील सर्व जलस्रोतांचे मॅपिंग करण्यामध्ये तसेच कोणकोणत्या भागात किती जलसाठा आहे याचे संशोधनात्मक अध्ययन करण्यामध्ये भारत हा आघाडीवर आहे. आज ग्रामीण भागात घराघरात पेयजलाची उपलब्धता होत आहे, असे याप्रसंगी सुनील कुमार यांनी सांगितले .यानंतर आयोजित पहिल्या तांत्रिक सत्रामध्ये केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे सदस्य डॉ. ए.के. अग्रवाल यांनी सांगितलं की देशभरातील एकवीफर ॲटलास अर्थात जलस्रोतांचा नकाशा हा केंद्रीय भूजल मंडळाद्वारे बनवल्या जात असून ‘एनक्वीम’ हा भूजल जलस्त्रोत व्यवस्थापनाचा कणा आहे.या कार्यक्रमांतर्गत ‘जलस्रोतांना जाणून घ्या, जलस्रोतांच व्यवस्थापन करा’ हा मुख्य कार्यभाग देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून साधला जात असल्याचा त्यांनी सांगितलं. एनक्वीमच्या अंमलबजावणीकरीता राज्य जिल्हा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर समित्या कार्यरत असून जिल्हाभरातील मुख्यालयात जलस्रोतांचे अहवाल मागितले जातात याप्रसंगी तांत्रिक सत्राच्या शेवटी आयोजित प्रश्न उत्तराच्या सत्रामध्ये पिकांच्या पाणी वापराच्या क्षमते बाबत तसेच भूजल वापर व्यवस्थापनाबाबत उपस्थितांनी तज्ञांना प्रश्न विचारले.

एन. वरदराज, प्रादेशिक संचालक, मध्य क्षेत्र, नागपूर यांनी कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रामध्ये राष्ट्रीय एक्विफर मॅपिंग आणि व्यवस्थापन या विषयावर महाराष्ट्र राज्याचा अभ्यास अहवाल सादर केला. तसेच इतर राज्याच्याही संचालकांनी आपले अहवाल या कार्यशाळेदरम्यान सादर केले.

या एकदिवसीय कार्यशाळेत तीन तांत्रिक सत्रामध्ये विविध तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजन करण्यात आले . ‘एनक्वीम’ कार्यक्रमाचे भविष्यातील व्यवस्थापन त्याचप्रमाणे या चर्चासत्रातून निघणारे सूचना, सल्ले तसेच भविष्यातील आराखडा या संदर्भात विचार मंथन झाले. या कार्यशाळेचे आभार प्रदर्शन केंद्रीय भूजल मंडळ,मध्य क्षेत्र नागपूरचे वरिष्ठ वैज्ञानिक कार्तिक डोंगरे यांनी केले.

या कार्यक्रमाला नागपूर मध्य क्षेत्र, लखनऊ येथील उत्तर क्षेत्र, रायपूर, भोपाळ येथील उत्तर मध्य क्षेत्र या क्षेत्रातील कार्यरत सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डचे अधिकारी कर्मचारी भूजल व्यवस्थापनातील तज्ञ तसेच वैज्ञानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NMC’s Rs 3336.84 cr budget for 2023-24 proposes No New NMC tax .

Sat Mar 25 , 2023
Nagpur : The Nagpur Municipal Corporation (NMC) administrator Radhakrishnan B on Friday presented a draft Rs 3336.84 crore budget for 2023-24 and after estimated expenditure of Rs3267.63 crore. He also presented the revised budget for the 2022-23 financial year. Earlier, he had tabled a Rs2,684.69 crore budget for last year. With rise in income from its own sources of revenue, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com