महिलांसाठी उद्योजकता व व्यवसाय संधीबाबत कार्यशाळा संपन्न  

– श्री श्री कौशल विकास केंद्रातर्फे करण्यात आले मार्गदर्शन

चंद्रपूर  :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बचत गटातील महिला तसेच वॉर्ड सखींकरीता उद्योजकता व व्यवसाय संधीबाबत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन २८ मे रोजी राणी हिराई सभागृहात करण्यात आले होते.याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी कार्यशाळेचा लाभ घेऊन आपले कौशल्य विकसित करण्याचे व रोजगाराच्या संभाव्य संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

नागपूर येथील श्री श्री कौशल विकास केंद्रातर्फे सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. श्री श्री कौशल विकास केंद्राला बॉश ( BOSCH ) या जागतिक स्तरावरील संस्थेकडून व्यावसायिक सामाजिक जबाबदारी ( CSR ) अंतर्गत निधी उपलब्ध होत असून या केंद्रात आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. यातील विविध अभ्यासक्रमाअंतर्गत उद्योग व नोकरीसाठी आवश्यक विशिष्ट कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स,पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लीश,मुलाखत देण्याचे कौशल्य,संगणक कौशल्ये,सोलर इन्स्टॉलेशन,एसी इन्स्टॉलेशन-रीपेयरींग,ईलेक्ट्रिशियन इत्यादी कौशल्ये शिकविली जातात.

या अभ्यासक्रमांचा कालावधी २ महिने असुन १० वी पास असलेले १८ ते २५ वयोगटातील व्यक्ती यासाठी पात्र आहेत. अभ्यासक्रम पुर्ण झाल्यावर केंद्रातर्फे विविध कंपनीमध्ये जॉब प्लेसमेंटही करण्यात येते. याकरीता प्रशिक्षण शुल्क १००० रुपये असुन निवास व भोजन व्यवस्था मोफत आहे. केंद्रातील महादेवी स्वामी व राहुल बारसे या प्रशिक्षकांनी या कार्यशाळेत महिलांना प्रशिक्षण दिले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,शहर अभियान व्यवस्थापक रफीक शेख,रोशनी तपासे बावणे, समुदाय संघटक रेखा लोणारे, पांडुरंग खडसे, सुषमा करमरकर तसेच सुमारे १०० महिलांनी उपस्थीती दर्शविली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माफी नाही, कठोरातील कठोर कारवाई करा - ॲड.धर्मपाल मेश्राम

Fri May 31 , 2024
– जितेंद्र आव्हाडांच्या कृत्यावर आक्रमक पवित्रा : संविधान चौकात आव्हाडांच्या फोटोला मारले जोडे नागपूर :- महाडचा सत्याग्रह कशासाठी होता, आंदोलनाची भूमिका काय होती, याचा कुठलाही अभ्यास नसताना केवळ स्टंटबाजीच्या नादात परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचे घृणीत कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या कृत्यावर माफी मागून पळवाट काढणा-या आव्हाडावर कठोरातील कठोर कारवाई करा, अशी मागणी भारतीय जनता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com