– प्रवास व पर्यटन विभागाचे आयोजन
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागात ‘पर्यटनामध्ये संवाद’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठातील परिसरात असलेल्या विभागात सोमवार, दिनांक २० फेब्रुवारी रोजी ही कार्यशाळा पार पडली.
ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.संजय पालवेकर, फ्रेंच भाषेवर प्रभुत्व असलेले नितीन कांबळे, आंतराष्ट्रीय टूर ऑपरेटर अमित नासेरी तसेच जपानी भाषा तज्ञ शेफाली वाहानेे यांची उपस्थिती होती. या प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळालं. विदेशी भाषेचे महत्व पर्यटन उद्योगात अनन्यसाधारण आहेे. विदेशी भाषेच्या ज्ञानामुळे अनेक रोजगार निर्मिती होत आहे. जसे दुभाषी, अनुवादक, गाईड यासारख्या अनेक कार्यामध्ये तसेच भारतीय दूतावासात काम करण्याची संधी सुद्धा उपलब्ध होत आहे. आज पूर्ण जग हे ‘ग्लोबल व्हिलेज’ झाले आहेत. यात इंग्रजी भाषेसोबत एखादी विदेशी भाषा शिकण म्हणजे आपल्या करियरला अधिक गती देण्यासारखे असल्याचे मत अतिथींनी व्यक्त केले. या कार्यशाळेचे आयोजन विभागाचे संचालक डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशपांडे यांनी केले. पाहुण्यांची माहिती नरेश सहारे, अमन गुंजेवार, प्रज्वल जरोडे, कुणाल दांडेकर यांनी दिली. आभार ईश्वर सोमकुवर यांनी मानले. या कार्यक्रमास विभागातील डॉ.अरविंद उपासनी, प्रा. मंजुषा डोंगरे, प्रा.भाग्यश्री हिरादेवे, प्रा. नेहा दुबे, प्रा.रीना दहिया, प्रा. शोभना मेश्राम, प्रा. डॉ. अमरदीप बारसागडे, प्रा.परिमल सुराडकर व विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.