कामगारांनी वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा- सीमा पांडे

नागपूर :- राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ हातमाग कामगारांनी घेण्याचे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त सीमा पांडे यांनी केले आहे.

राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम 2021-22 ते 2025-26 अंतर्गत दिशानिर्देशानुसार जीवन विमा योजनेसाठी नोंदणी केलेल्या 18 ते 50 वर्ष वयोगटातील हातमाग कामगाराचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला त्याला 2 लाख रुपये विमा अनुज्ञेय आहे. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजने अंतर्गत 18 ते 70 वर्ष वयोगटातील हातमाग कामगारांचा मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अंपगत्व आल्यास 2 लाख रूपये तसेच अंशत: अंपगत्व आल्यास 1 लाख रूपये विमा अनुज्ञेय आहे. महात्मा गांधी बुनकर विमा योजने अंतर्गत लाभार्थी पॉलिसी धारकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांना 60 हजार, अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अंपगत्व आल्यास 1 लाख 50 हजार व अंशत: अपंगत्व आल्यास 75 हजार रुपये विमा रकम अनुज्ञेय आहे.

याशिवाय वस्रोद्योग विभागामार्फत हातमाग विणकरांना उद्योगासाठी मुद्रा योजना, मार्जीन मनी योजना तसेच हातमाग कामगारांच्या मुलांना 2 लाखापर्यंत शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यात येतो.

या सर्व योजनांचा लाभ जास्तीत जास्त हातमाग कामगारांनी घ्यावा व अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त (वस्त्रोद्योग) यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र. 2, आठवा माळा, सिव्हील लाईन, नागपूर येथे संपर्क साधावा, असे उपायुक्त सीमा पांडे यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या कामठी तालुकाध्यक्षपदी भाजप चे रमेश चिकटे यांची नियुक्ती

Thu May 11 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- समाजात उपेक्षित जीवन जगणाऱ्या दिव्यांग,विधवा,परितक्त्या,अनाथ,दुर्धर आजाराने ग्रस्त व निराधारासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध अर्थसहाय्य योजना चालविल्या जातात ज्यामध्ये ही लाभार्थी निवड करतेवेळी लाभार्थी अर्जदाराच्या अर्जाला जोडलेली कागदपत्रांची योग्य ती शहनिशा करून लाभ मिळवून देणे तसेच कोणीही या लाभापासून वंचित राहू नये याची दक्षता घेणेहेतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समिती नेमण्यात आली असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!