शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर, मनपा प्रशासनाने तातडीने राबविली आपत्ती व्यवस्थापन मोहीम

चंद्रपूर  :- चंद्रपूर शहरात काल दि.२१ एप्रिल २०२३ रोजी रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सदर घटनेची माहीती चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनास कळताच तातडीने कोसळलेली झाडे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून अधिकांश परिसर रहदारीस मोकळा करण्यात आला आहे.     काल वादळात शहरातील हवेली गार्डन,जटपुरा,मनपा फायर ऑफीस,गजानन बाबा मंदिर, स्नेहनगर,बगळा चौक, भानापेठ वॉर्ड,रेव्हेन्यू कॉलोनी,एसटी वर्कशॉप,सरकार नगर,आंबेडकर नगर,न्यायाधीश कॉलोनी,आझाद गार्डन,विठ्ठल मंदिर,रघुनंदन लॉन जवळ,सिव्हील लाईन इत्यादी परिसरात २० ते २२ भागात झाडे पडण्याच्या घटना घडल्या.तसेच गायत्री नगर वडगाव येथील एका घरावर आयडिया कंपनीचे मोबाइल टॉवर सुद्धा पडले,सुदैवाने यात जीवित हानी अथवा कुणी जखमी होण्याची घटना घडली नाही.

अनेक जागी झाडे पडल्याने रहदारीस अडथळा होईल हे लक्षात घेता मनपा अग्निशमन विभाग,उद्यान विभाग व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे सदर झाडे हटविण्याची मोहीम रात्रीच हाती घेण्यात आली.शहराच्या विविध भागातील १५ ते १६ झाडे हटवुन रात्रीच रस्ता मोकळा करण्यात आला तर उर्वरीत ठिकाणची झाडे हटविनयचे काम सुरु आहे. काल आलेल्या वादळात वाहणारे वारे हे अत्याधिक गतीने वाहत होते तसेच पावसाचाही जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी नागरीकांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला. पुढील काही दिवस सुद्धा वादळी वाऱ्याचा इशारा असल्याने वातावरणाचा अंदाज घेऊनच नागरीकांनी आपल्या घराबाहेर पडण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माता पिता और गुरुजनो की आज्ञा पालन करना ही अक्षय तृतीया पर्व की सार्थकता है। 

Sat Apr 22 , 2023
अक्षय तृतीया के पावन दिन ही भगवान विष्णु के छठे अवतार भगवान श्री परशुरामजी का जन्म हुआ था। इस दिन को भगवान परशुराम के जन्मोत्सव के रूप में भी मनाया जाता है। धार्मिक मान्यताओं के अनुसार अक्षय तृतीया के पावन दिन ब्रम्हाजी कमंडल से गंगा जी देवाधिदेव भगवान भोलेनाथ की जटा मे समाहित हूई थी और शंकर की जटा से […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com