-रूजू होण्यास तयार नाही
नागपूर – मागच्या वर्षातील आंदोलन नव्या वर्षात पोहोचले. मात्र, संपकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अनेक प्रयत्न केल्यानंतरही संपकरी कामावर परण्यास तयार नाहीत. त्यामुळे एसटी प्रशासनाचे आर्थिक नुकसान तर होत आहेच शिवाय प्रवाशांची प्रचंड गैरसोय आहे. प्रवाशांना दुप्पट भाडे देवून प्रवास करावा लागतो. सुरक्षित प्रवासाची हमी नसली तरी पर्याय नसल्याने सामान्य प्रवासी दुप्पट भाडे देतात. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीही संपकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत.
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने ६ डिसेंबर पासून प्रवासी वाहतूक सुरू केली. दोन बसपासून सुरू झालेली प्रवासी वाहतूक १८ बसगाड्यापर्यंत पोहोचली. दरम्यान प्रशासनाने निलंबन आणि बडतर्फीची कारवाई केल्यानंतर गेल्या १० दिवसांत केवळ ४३ कर्मचारी कामावर रुजू झाले आहे. शनिवारी केवळ एक कर्मचारी कामावर परतल्याने संख्या ४३ वर पोहोचली आहे. यात चालक ९, वाहक १५, चालक कम वाहक ८, यांत्रिक ६, लिपीक १, वाहतूक नियंत्रक २, वरिष्ठ लिपीक १ आणि स्वच्छक १ असे एकूण ४३ कर्मचारी आहेत.
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी जवळपास गेल्या दोन महिन्यापासून कर्मचार्यानी संप पुकारला आहे. नागपूर विभागात २ हजार ४९२ कर्मचारी आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ ७०० कर्मचारी कामावर हजर आहेत. जवळपास १८०० कर्मचारी संपावर असून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान काही बसगाड्या आणि प्रवासी वाहतूक सुरू आहे. याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी १० दिवसात केवळ ४३ कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत.
विभागात वर्षाच्या पहिल्याच दिवशी १८ बसेने २०२० प्रवाशांनी प्रवास केला. या कालावधीतील बस आणि प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. प्रवासी वाहतुकीतून एसटी प्रशासनाला १ लाख २४ हजार ५२५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. पहिल्याच दिवशी एकूण ५८ फेर्या झाल्या. गणेशपेठ – ४, इमामवाडा- ३ घाटरोड -३, उमरेड – ३, सावनेर -३, वर्धमान – १, रामटेक- १ अशा १८ बसचा समावेश होता.
प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून विभाग नियंत्रक आणि आगारातील अधिकारी प्रवासी वाहतूक वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे बहुतांश संपकरी विलीनीकरनाच्या मागणीवर ठाम आहेत.
कामावर परतण्यास संपकऱ्यांचा नकार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com