भंडारा :- महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या योजनेची घोषणा केली आणि योजनेचे अर्ज भरण्यासाठी अक्षरशः झुंचड उडाल्याचे आपण पाहत आहोतं. मात्र ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरताना सव्हरमध्ये अनेक अडचणी येत आहेत. परिणामी आज सर्वस्त्र ऑफलाईनरित्या अर्ज जमा केले जात आहेत. जमा केलेले हे अर्ज देखील ऑनलाईन माध्यमातूनच भरावे लागणार आहेत. हे नक्की, पण सध्या सरकारकडून ऑनलाईन माध्यमातून शासनाचे संकेतस्थळ आणि पर्यायाने शासनाच्या सव्र्व्हरवर येणारा भार कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील सुमारे २७ लाख भगिनींना मुख्यमंत्री महोदयांच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना निश्चितच स्वागलाई आहे. परंतू या योजनेचा लाभ मिळविण्यासाठीची प्रक्रिया शासनाच्या सव्हरमुळे क्लिष्ट होताना दिसत आहे.
आज अर्धा जुलै महिना उलटून गेला. विद्यार्थ्यांचे अनेक अभ्यासक्रमांसाठीचे अॅडमिशन अद्यापही सुरुच आहेत. महाविद्यालयात प्रवेशासाठी तसेच पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास देखील विद्यार्थी असमर्थ ठरत आहेत. केवळ आणि केवळ सव्र्व्हर डाउन असल्याने या सर्व समस्या पुढे येत आहेत. राज्यातील २७ लाख लोकसंख्येसाठी एखादी योजना आखली जाते तेव्हा त्या योजनेचा लाभ सुचारु पद्धतीने मिळावा यासाठी तशी यंत्रणा सक्षम का केली जात नाही, हा प्रश्न यानिमिताने उपस्थित होतो आहे. आपण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या राज्याचे प्रतिनिधित्य देशात करतो. आज देश डिजिटल इंडियाच्या दिशेने बराच पुढे जात आहे. अशात डिजिटल इंडियाला मारक कृती शासनाकडून कुणाला अपेक्षित असेल?
आज विद्यार्थी आणि महिला भगिनी हे सर्व सेतू केंद्र, आनलाईन अर्ज भरणा केंद्र येथे एकाच रागेल दिसत आहेत. तासन् तास रांगेत उभे राहूनही आमच्या संकेतस्थळाचं पानही हलत नाही, ही परिस्थिती महाराष्ट्राला डिजिटली अधोगतीकडे नेणारी नाही का? अशी शंका येत आहे तरी
सर्व्हर फ्रिक्वेन्सी वाढवून कामाला गती देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी निवेदन च्या माध्यमाने मागणी केली आहे.
निवेदन देते वेळेस जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, एकनाथ फेंडर, मधू भोपे,दशरथ भुजाडे, गुड्डू बांते, प्रफुल्ल मेश्राम , भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.