शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने काम व्हावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– क्लिक टू क्लाऊड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या कार्यालयाचे भूमिपूजन

नागपूर :- कृषिआधारित व्यवस्था विकसित करण्यावर फोकस करणे आणि विदर्भातील शेतकऱ्यांची प्रगती कशी होईल यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) व्यक्त केली.

मिहान येथे क्लिक टू क्लाऊड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसच्या कार्यालयाचे भूमिपूजन श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने काम व्हावे. त्यासोबतच कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न व्हावे, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला मिहान सेझचे विकास आयुक्त व्ही. श्रमन, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, क्लिक टू क्लाउड संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिश्रा, कुसुमलता मिश्रा यांची उपस्थिती होती.

ना. गडकरी म्हणाले, ‘मिहानला विकसित करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. मिहानमधून लवकरच १ लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे.’ यावेळी ना. गडकरी यांनी क्लिक टू क्लाउड कंपनीद्वारे विकसित ‘अॅग्रिपायलट’ या प्रकल्पाचे सादरीकरण बघितले. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीचे उत्पादन वाढविण्यास फायदेशीर ठरणारा हा प्रकल्प आहे. कंपनीद्वारे कॉम्पॅक्ट सॉइल डॉक्टरची निर्मिती करण्यात आली असून शेतकऱ्यांना काही मिनिटांमध्ये मृदा परीक्षण करून मिळणार आहे. ना. गडकरी यांनी यासंदर्भात माहिती घेतली व प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. क्लिक टू क्लाउड कंपनी आयआयएम नागपूरच्या सहकार्याने फार्म रिसर्च लॅब तयार करणार आहे. या लॅबमध्ये पूर्णत: एआय अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी उपयोगाचे ठरेल, असे तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री फडणवीसांवरील जरांगेंच्या टिका ‘स्क्रीपटेड’ - जयदीप कवाडे

Mon Feb 26 , 2024
– शरद पवारांना 40 वर्षानंतर रायगड वारीचा योग आर्श्चयकारक – ‘मविआ’कडून मराठा समाजाची दिक्षाभूल करण्याचे षडयंत्र मुंबई/नागपुर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगेंकडून होणारी टिका ही दिलेल्या स्क्रीप्ट प्रमाणे होत असल्याचे दिसत आहे. फडणवीस साहेबांची जात काढून त्यांना बदनाम करण्याची सुपारी सध्या जरांगेनी घेतली असून त्यांनी लावलेले गंभीर आरोपातून तुतारीचा आवाज येत आहे. असा आरोप पीपल्स […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com