कन्हान :- ग्राहक पंचायत महाराष्ट्र पारशिवनी तालु का व्दारे सौ कांचनमाला माकडे यांच्या मार्गदर्शनात आणि माहेर मंच कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने सुनिता मानकर यांनी महिलांचा ” संक्रांत महोत्सव ” थाटात संपन्न केला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व आदरणिय बिंदु माधव जोशी यांच्या प्रतिमेचे कार्यक्रमाच्या अध्यक्षा कांचनमाला मोरेश्वर माकडे अध्यक्षा ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपुर ग्रामिण, प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, माहेर मंचच्या अध्यक्षा रिता नरेश बर्वे यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी मान्यवरांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कार्या विषयी महिलांना मार्गदर्शन केले. तदंतर ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या कॅलेंडरचे विमोचन करून माहेर मंचच्या सर्व कार्यकारणी पदाधिकारी महिलांना ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कॅलेंडर वितरित करण्यात आले. कन्हान परिसरातील शेकडो महिलांनी ” संक्रांत महोत्सव ‘ कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सुनिता मानकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र पारशिवनी तालुका, माहेर महिला मंच कन्हान च्या पदाधिकारी, सदस्य महिलांनी सहकार्य केले.