नागपूरात प्रदेश महिला काँग्रेसचा महिला न्याय आंदोलन

नागपूर :-अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरात “महिला न्याय आंदोलन” दि. २९ ॲागष्ट २०२४ रोजी आयोजीत करण्यात आले आहे, त्यासंबंधात नागपूर शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष ॲड. नंदा पराते याच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवन येथे महिला काँग्रेसच्या शहर कार्यकारणीच्या पदाधिकारींची सभा झाली, त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ.संजीवनी बिहाडे ,विद्या पाटील,डॉ. रेखा चव्हाण ह्या उपस्थित होत्या.

शहर महिला काँग्रेस कार्यकारणीच्या सभेत शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते म्हणाल्या की महायुती सरकारने महिलांची सुरक्षा केली नसल्याने मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार वाढत आहे, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यास शिंदे-फडणवीस सरकारला अपयश आल्याचे चित्र माध्यमातून दिसूनही राजीनामा देत नाही . नागपूरात महिला न्याय आंदोलनात महिलांना न्याय व महिलांवर होत असलेले अन्याय-अत्याचार यावर चर्चा होणार आहे.

संपुर्ण महाराष्ट्रातून हजारो महिला प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होत असल्याने हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक प्रभाग, ब्लॅाक मध्ये शहर कार्यकारणीचे पदाधिकारी यांनी महिला जागृती मोहीम सुरू करावी. या सभेत उपस्थित झालेल्या प्रदेश निरिक्षकांनी महिला न्याय आंदोलनाच्या रूपरेषाबाबत मार्गदर्शन केले.

नागपूरात दि.२९ ॲागष्ट २०२४ रोजी होणाऱ्या महिला न्याय आंदोलनात महिला लाल रंगाचे वस्त्र परिधान करून येतील. नागपूरात महिलांचे होत असलेले आंदोलन यशस्वी करून भाजपच्या नेतृत्वाची अन्यायकारी सरकारच्या विरोधात संघर्ष करण्याचे नागपूर शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी जबाबदारी घेतल्याचे महिला कॅाग्रेस शहराध्यक्ष ॲड.नंदा पराते यांनी प्रसिद्घी पत्रातून म्हटले आहे.

सभेचे संचालन जयश्री धार्मिक तर आभार प्रदर्शन रोशनी नितनवरे यांनी केले. महिला काँग्रेसची सभा संगीता उपरीकर , गिता हेडाऊ ,पूजा बाबर, शकुंतला वट्टीघरे, माया धार्मिक, सुरेखा लोंढे, मंजू पराते, माया नांदुरकर, ज्योती जरोंडे, कल्पना गोस्वामी, पूजा देशमुख, डायना लिंगेकर, स्नेहा पेटकर, प्रमिला धामने , वर्षा देशमुख, राजेश्री शिंदे, शशिकला बुरडे, मंदा शेंडे यांनी यशस्वी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

त्या अपघाताशी महावितरणचा संबंध नाही, चोरीच्या उद्देशाने गेलेल्या दोघांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

Wed Aug 21 , 2024
नागपूर :- मौझा पेवठा येथील कमलेश उईके आणि नितेश बागबंडे यांचा आशिष मेश्राम यांच्या शेतात झालेल्या विद्युत प्राणांतिक अपघाताशी महावितरणचा दुरान्वयानेही संबंध नसून सदर अपघात हा वीज तारा चोरीच्या उद्देशाने वीज तारा तोडून टाकत असतांना झाला असल्याची पुष्टी विद्युत निरीक्षक आणि स्थानिक पोलीसांनी केली असल्याची माहिती महावितरणतर्फ़े देण्यात आली आहे. याशिवाय, शेतमालक आशिष मेश्राम यांनी त्यांच्या लेखी जबाबात या दोन्ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com