जिल्हाधिकारी कार्यालयात 18 जुलै रोजी महिला लोकशाही दिन

तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयवरळी येथे उपलब्ध

मुंबई महिलांच्या तक्रार निवारणासाठी सोमवार दि. 18 जुलै रोजी “महिला लोकशाही दिना”चे आयोजन जिल्हाधिकारीमुंबई शहर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई येथे सकाळी 11:00 वा. करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीमुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

समस्याग्रस्तपिडीत महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी “महिला लोकशाही दिना”चे आयोजन केले जाते. त्यानुसार जुलै महिन्यातील महिला लोकशाही दिन दि. 18 रोजी होणार आहे.

महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 117, बी.डी.डी. चाळपहिला मजलावरळीमुंबई – 18 येथे उपलब्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Thu Jul 7 , 2022
   मुंबई, (रा.नि.आ.) : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.   भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!