– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 7 :- स्त्री म्हणजे लाजाळू,दुबळी व भावनिक असा समाजात गैरसमज आहे .परंतु वेळ पडल्यास हीच घरातील स्त्री बिकट परिस्थितीला तोंड देऊन यशस्वी जीवनाची वाटचाल सुद्धा पार पाडते हे सगळे शक्य झाले आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे व संविधानाने दिलेल्या हक्कामुळेच, आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडी मारत असून यश पादांक्रीत करीत असल्याचे वास्तविक दृश्य आपल्या सर्वांच्या डोळयासमोर असून अभिमानस्पद असल्याचे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यानी काल जागतिक महिला दिनानिमित्त कामठी येथील ड्रॅगन पॅलेस , दादासाहेब कुंभारे परिसर स्थित एमटीडीसी सभागृहात आयोजित निर्धार महिला पुरस्कार 2022 प्रदान समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी विमला आर यांनी आजची स्त्री ही चूल आणि मूल इतक्या पर्यन्त मर्यादित राहली नसून परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी दिलेल्या भारतीय संविधानामुळे प्रशासनासह इतर सर्व सामाजिक , राजकीय ,शैक्षणिक, पत्रकारिता, सांस्कृतिक आदी क्षेत्रात प्रमुखतेचो भूमिका साकारत कर्तृत्वान भूमिका साकारून नावलौकिक करीत असल्याचे समयोचित मार्गदर्शन केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 8 मार्च जागतिक महिला दिननिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सम्मान व्हावा या मुख्य उद्देशाने डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र , हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल , दादासाहेब बशुउद्देशिय प्रशिक्षण केंद्र,निर्धार महिला व बालविकास संस्था कामठी च्या संयुक्त विद्यमाने कामठी येथील एमटीडीसी सभागृहात 7 मार्च ला निर्धार महिला पुरस्कार 2022 प्रदान समारंभ आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षा माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी विमला आर यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रात कर्तृत्वान भूमिका कार्यरत नावलौकिक करणाऱ्या सत्कारमूर्ती महिलांचा सम्मान करण्यात आला.
या सत्कारमूर्ती मध्ये सामाजिक क्षेत्रातील शिलाताई मेश्राम, विद्याताई भीमटे, वंदना आळे, शैक्षणिक क्षेत्रातील शबनम वाजीदा , पांडे मॅडम, धार्मिक क्षेत्रातील ब्रह्मकुमारी प्रेमलता दिदी, डॉ रुबिना जमी अन्सारी, राजकीय क्षेत्रातील माजी उपाध्यक्ष शाहिदा कलिंम अन्सारी, साहित्य क्षेत्रातील सेजल पंजवाणी, प्रशासन क्षेत्रातील महिला पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर, शोभा पानतावणे, कला क्षेत्रातील श्रीवस्ती हाडके, क्रीडा क्षेत्रातील निशा डोंगरे, सेजल नागदेवें, उद्योग क्षेत्रातील रंजना पानतावणे, ऍड रिना गणवीर, सांस्कृतिक क्षेत्रातील श्रुती रवींद्र वानखेडे, पत्रकारिता क्षेत्रातील रंजना नारनवरे, संचालन क्षेत्रातील अकलेशा मेश्राम , रुबिना अन्सारी तसेच माजी नगराध्यक्ष रिजवाना कुरेशी, नगरसेविका सावलाताई सिंगाडे, नगरसेविका सरोजताई सिद्धार्थ रंगारी, नगरसेविका रमाताई नागसेन गजभिये,नगरसेविका वैशालिताई मांनवटकर, नगरसेविका मंदाताई चिमनकर, नगरसेविका संध्याताई उज्वल रायबोले, नगरसेविका सुषमाताई सिलाम, नगरसेविका पिंकीताई वैद्य, नगरसेविका मिनाक्षीताई बुरबुरे, नगरसेविका ममताताई कांबळे, किरणताई मानवटकर चा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सम्माणीत करण्यात आले.
याप्रसंगी रेखा भावे, शालू सावरकर, सुमन घरडे,सुकेशनी मुरारकर, निशा फुले, प्रतिभा देशभ्रतार, विना थुले, देवांगणा गजभिये, आशा चहांदे, चित्रलेखा महिले, पुष्पां मेश्राम, रेखा पाटील, सीमा सोमकुवर, शिला मेश्राम, शोभा शंभरकर, सुजाता लिंगायत, रुखमा वासनिक, आशा चहांदे, मीना चव्हाण, अलका तांबे, मीरा शंभरकर, प्रतिभा वासनिक, आशा गजभिये, अनिता बांबोर्डे, लक्ष्मी रंगारी, किरण राऊत, विशाखा गेडाम, यशोधरा रामटेके, सुषमा डोंगरे, इंदिरा खांडेकर, मेहरुनीसा शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजकाच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाची भूमिका साकारली.