महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी उद्यमशिलतेकडे वळावे केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या माजी सदस्य सुलेखाताई कुंभारे यांचे आवाहन

नागपूरातील तीन दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सवाचा समारोप

नागपूर –  महिला सक्षमीकरणासाठी महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असायला हवे . याकरिता महिलांनी  उद्यमशिलतेकडे वळावे असे आवाहन राष्ट्रीय  अल्पसंख्याक आयोगाच्या माजी सदस्या आणि माजी राज्यमंत्री  अ‍ॅड.  सुलेखाताई कुंभारे यांनी केले .एमआयए हाउस  हिंगणा एमआयडीसी येथे केंद्रीय सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या एमएसएमई विकास संस्था नागपूर  आणि विविध उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 14 मार्च, 2022 या कालावधीत खासदार औद्योगिक महोत्सव सह औद्योगिक प्रदर्शन आणि परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याच्या समारोप समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी  आदिवासी विकास आयुक्तालयाचे  आयुक्त  रवींद्र ठाकरे, एमएसएमई-डीआय चे संचालक  पी.एम.पार्लेवार प्राम्यख्याने उपस्थित होते.

 

खासदार औद्योगिक  महोत्सवाच्या आयोजनामुळे विदर्भातील एमएसएमईच्या विकासासाठी निश्चितपणे मदत होईल. त्याचप्रमाणे, एमएसएमईंना देखील विक्रेता विकास कार्यक्रमांचा फायदा होईल, असे अ‍ॅड. कुंभारे यांनी सांगितले. 

संभाव्य आणि विद्यमान उद्योजकांना उद्योजकतेमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी या प्रकारचे कार्यक्रम आणि इंडस्ट्रियल एक्स्पो आवश्यक आहेत , असे  आदिवासी विकास आयुक्तालयाचे  आयुक्त  रवींद्र ठाकरे यांनी सांगितल.

 

एमएसएमई-डीआय चे संचालक श्री पी.एम.पार्लेवार यांनी या तीन दिवसीय महोत्सवात सहभागींनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की अशा प्रकारच्या इंडस्ट्रियल एक्स्पो आणि खरेदीदार-विक्रेते संमेलनामुळे विदर्भातील लोकांमध्ये एमएसएमई तसेच  सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रमा बाबत जागरुकता निर्माण होण्यास मदत होते आणि स्थानिक विक्रेते त्यांच्या  वेंडर्सची गरज  पूर्ण करतात.  या सर्व हितधारकांना एकत्र येण्यासाठी आणि  परस्पर लाभ  घेण्यासाठी एक  समान मंच  प्रदान करणे हा यामागचा उद्देश होता. याने एमएसएमईंना त्यांची उत्पादने उद्योग आणि धोरण निर्मात्यांना दाखविण्याची संधी दिली आणि एमएसईंना व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मोठ्या उद्योगांशी  जुळण्याची  संधी दिली, असे पार्लेवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सी.जी.शेगावकर, अध्यक्ष, एमआयए, हिंगणा म्हणाले की,औद्योगिक एक्स्पोमध्ये एमएसएमईची उत्पादने आणि सेवा मोठ्या उद्योगांना आवश्यक असलेल्या सुटे वस्तू आणि सेवांची विस्तृत श्रेणी प्रदर्शित केली गेली ज्याचा सर्व क्षेत्रांना फायदा झाला. खासदार औद्योगिक महोत्सव कम इंडस्ट्रियल एक्स्पोमुळे विदर्भातील एमएसएमईंना मदत झाली असून त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील उद्योगांच्या वाढीस नक्कीच मदत होईल यावरही त्यांनी भर दिला. त्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

 

प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष,  बुटीबोरी मॅन्युफॅक्चर असोसिएशन यांनी देखील कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की भविष्यात देखील अशा प्रकारचे कार्यक्रम एमएसएमई विकास संस्था नागपूर द्वारे सर्व स्थानिक उद्योग संघटनांच्या सहकार्याने एकत्रितपणे आयोजित केले जातील  .

सुमारे 67 स्टॉल्सनी इंडस्ट्रियल एक्स्पो दरम्यान त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित केल्या ज्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि उद्योजकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात मदत झाली. कार्यक्रमादरम्यान कर्ज मेळावाही आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्टार्ट-अप्स आणि गुंतवणूकदारांबद्दल बैठक देखील आयोजित करण्यात आली होती जिथे स्टार्ट अप्सनी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, उत्पादने इत्यादींबद्दल गुंतवणूकदारांशी संवाद साधला. समारंभाच्या वेळी उपस्थितांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  एमएसएमई विकास संस्था नागपूरचे सहाय्यक संचालक  राहुल के.मिश्रा व प्रफुल उमरे यांनी केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विरोधी पक्षनेते म्हणतात न्यायालयात जाणार ;आनंद वाटला त्यांचा एका तरी यंत्रणेवर विश्वास आहे - दिलीप वळसेपाटील

Tue Mar 15 , 2022
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची जोरदार बॅटींग;विरोधकांच्या आरोपांची हवाच काढून टाकली… मुंबई पोलिस दलावर विश्वास न ठेवता प्रत्येक प्रकरण सीबीआय किंवा अन्य यंत्रणेकडे द्या असे विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे दुःखद… आपण काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?पेनड्राईव्हवर गृहमंत्र्यांचा सवाल…https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 पेनड्राईव्ह प्रकरणाचा सीआयडीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय…https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 मुंबई – केंद्रीय यंत्रणाचा वापर करताना आपले प्रवक्ते अमुक- तमुक नेत्यावर कारवाई होणार असे आधीच जाहीर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com