मोटरसायकलच्या शिटमध्ये चटई विक्रीच्या नावावर गांजाची विक्री ४३.५४० किलो गांजा व इतर साहित्य जप्त 

नागपूर :- पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद यांचे आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २४/०५/२०२३ रोजी नागपूर विभागात अवैध धंदे विरूद्ध कारवाई करीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, मौजा चिमनाझरी शिवारातील राजस्थानी धाब्याजवळ मोटरसायकलने गांजा विक्री करीता इसम येणार आहेत प्राप्त माहितीनुसार राजस्थानी धान्याजवळ बाजूचे मोकळया जागेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोहचताच पोलीसांना पाहुन तीन इसम पळुन गेले. ते बसलेले असलेल्या ठिकाणी त्यांचे मोटरसायकलीची झडती घेतली व मोटरसायकलवर बांधलेल्या चटईची झडती घेतली असता मोटरसायकलच्या सिट व चटई मध्ये ४३.५४० किलो हिरव्या रंगाचे ओलसर गांजा किंमती ४३५४००/- रु. वाहन क्र. १) यु.पी.- ७४ ए.डी – ८९११ २) एम.एच-४० एवाय- ८९३९ ३) आर. जे. ०७/जी.एस- ६२८२ नमुद ठिकाणावरून तिन मोटरसायकली, ०३ मोबाईल व इतर साहित्य व ४३.५४० किलो हिरव्या रंगाचे ओलसर गांजा किमती ४३५४००/- रूपयाचा असा एकुण ६,९१,३००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून आरोपीने सोडलेले सामानामध्ये डेबिट कार्ड, वोटर आयडी कार्ड, आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. तसेच जोडे कपड्यांच्या बॅगा जप्त करण्यात आलेल्या आहे. सदर बाबत पोलीस स्टेशन बेला येथे अनोळखी तिन आरोपीतांविरूद्ध कलम ८ (क), २० (व) 11 (क) NDPS ACT 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, सहायक फौजदार चंद्रशेखर घडेकर, पोलीस हवालदार मिलींद नांदुरकर, दिनेश आधापुरे, पोलीस नायक अमृत किनंगे, विपीन गायधने, रोहन डाखोरे, मयुर डेकळे, चालक पोलीस शिपाई सुमित बांगडे यांच्या पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपीतांना कोर्टातून शिक्षा

Thu May 25 , 2023
कन्हान :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. कन्हान येथे अप. क्र. २३५/२०१८ कलम ३५४ (अ. ड).३४ भादवि सहकलम १९(१), १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील पिडीता फिर्यादी ही सिलाई मशीनचे काम शिकुन कन्हान वरुन आपले घरी परत येत असता यातील आरोपी नामे- १) मोनु उर्फ नौशाद ईदरीस शेख वय २० वर्ष रा. कांद्री २) साहील चंद्रभान चौधरी वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com