महिला लोकशाही दिन 17 जानेवारी रोजी

नागपूर, दि. 14 :  राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून  जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत माहे जानेवारी 2022 चा महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे  सोमवार, दिनांक 17 जानेवारी 2022  रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही दिनाच्या तक्रारीचे खालील प्रमाणे निकष आहेत.

अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा., तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे.

खालील प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत :

न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसावे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

रामटेकच्या आर्यन स्पोर्ट क्लब ची स्केटिंग मध्ये उंच भरारी

Fri Jan 14 , 2022
-रामटेक च्या खेळाडूंनी पटकविला सुवर्ण  पदके  मिळविण्याचा मान.    रामटेक –  तालुका क्रीडा संकुल सावनेर येथे आयकॉन स्केटिंग अकादमी सावनेर तर्फे घेण्यात आलेल्या दुसरी खुली विदर्भ स्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा – 2022. या स्पर्धेत R.N स्पोर्टिंग क्लब, रामटेक च्या खेळाडूंनी एकूण अकरा पदके प्राप्त केली. स्पर्धेत एकूण संपूर्ण विदर्भातील 300 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यात R.N स्पोर्टिंग क्‍लब, रामटेक च्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!