नागपुर – जागतिक महिला दिनी दक्षिण नागपुरच्या ब्यानर्जी ले-आउट मध्ये असलेल्या संत कैकाडी महाराज उद्यानात महिलांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या रंजनाताई ढोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानल्या शिवाय महिलांचा उद्धार होणार नाही, कारण बाबासाहेब आंबेडकर यांनीच भारतीय संविधानाच्या माध्यमातून महिलांना मतदानापासून तर संपत्तीपर्यंतचे पुरुषांच्या बरोबरीचे सर्व अधिकार दिले. नोकरीत सन्मानाचे जीवन, प्रसूती रजा सुद्धा बाबासाहेबांमुळे महिलांना उपभोगता येतात, म्हणून महिलांनी बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानावे असे रंजनाताई ढोरे ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हल्ली जीजाऊ, सावित्री, रमाई नंतर देशात कर्तुत्ववान महिलांमध्ये मायावती ह्या लोहस्त्री व कुशल संघठक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य महिलांची आयकॉन म्हणून मायावतिला स्वीकारण्याचे आवाहनही याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या रंजनाताई ढोरे यांनी केले.
याप्रसंगी विजया मडके, प्रभा रामटेके, सावित्रीताई मेंढे, अनिता वासनिक, तागडे ताई यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर भिमगडे व रोहिणी वाकोडे यांनी गीत गायन केले. कार्यक्रमात सावित्री-रमाई ह्यांच्या फोटो ठेवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना मानके यांनी, प्रास्ताविक मीना मेश्राम यांनी तर समारोप सारिका गोंधळेकर यांनी केला. अगदी सकाळी 8 वाजता झालेल्या गार्डन कार्यक्रमाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पुरुषही कार्यक्रमाची शोभा वाढवीत होते.