– महायुतीच्या कळमेश्वर, काटोल व नरखेड गावात नमो संवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद
नागपूर :- 54 वर्ष काँग्रेसची सत्ता असताना जे काम झाले नाही ते मोदी सरकारने केले. महाराष्ट्रात पंतप्रधान ग्राम रस्ते योजना व मुख्यमंत्री ग्राम रस्ते योजनेतून गावागावांत विकास कार्य झाले आहे. एक काळ राजीव गांधी पंतप्रधान असतांना ते ब्राम्हणी व कळमेश्वर तालुक्यासाठी जर 1 रुपया निधी देत होते. तो निधी या दोन्ही तालुक्यांना फक्त 15 पैसे भेटायचा, उर्वरित 85 पैसे हे सावनेरचे काँग्रेस नेते पचव्हायचे हे खुद्द राजीव गांधी म्हणाले. आताची परिस्थीत अशी आहे की, पंतप्रधान मोंदी सरकारने जर ब्राम्हणी व कळमेश्वरला जो 1 रुपया निधी पाठविला तो पूर्ण पोहचून विकासाच्या कामाला लागतो. याचे उदाहरण सावनेर, खापा, मोहाड येथील रस्त्यांचे कामांनी दिसून येते. त्यामुळे यंदा आपल्याला सावनेर क्षेत्राचा विकास कामांना असेच पुढे नेण्याची गरज आहे. त्यासाठी उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार राजू देवनाथ पारवे यांना विजयी करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
रविवारी कळमेश्वर, काटोल व नरखेड तालुक्यात रामटेक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या महायुतीच्या नमो संवाद यात्रेच्या कळमेश्वर येथील प्रचार सभेत बावनकुळे बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार आशिष देशमुख, आमदार टेकचंद सावरकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, भाजप नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, मनोहर कुंभारे, कळमेश्वर शहर अध्यक्ष धनराज देवके, तालुका अध्यक्ष संदीप उपाध्ये, रमेश मानकर, सावनेर अध्यक्ष मंदार मंगळे, रामराव मोवाडे, दिलीप धोटे, इमेश्वर यावलकर, प्रकाश टेकाडे, किशोर चौधरी रामटेकचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह महायुतीच्या घटक पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी आज पुण्याला होतो पण रामटेकच्या प्रचार मोहिमेला मला आग्रहाने बोलविण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांमुळेच त्यांच्यावर देशातील जनतेचा पूर्ण विश्वास आहे.
पंतप्रधान मोदी येताहेत रामटेकवासीयांना भेटायला
आज राज्यात महायुतीचे सरकारचे कामही पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात होत आहे. इतके वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेस ने कधीही गरिबी हटविली नाही. परंतु, मोदी सरकारने 25 कोटी गरीब जनतेचा उद्धार केला. एव्हढच काय तर काँग्रेस ने 86 कोटींचा घोटाळा करून ठेवला आहे. जर त्यांना पुन्हा सत्ता गेली तर ते त्याहून जास्त घोटाळे करणार. जर मोदींना पुन्हा पंतप्रधान बनव्याच असेल तर आपल्याला उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार राजू देवनाथ पारवे यांच्या धनुष्य बाण चिन्हाची बटन दाबून विजयी करावे लागेल. तसेच बुधवारी 10 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्राच्या जनतेला भेटण्यासाठी येत आहे.
कन्हान पोलिस स्टेशन जवळील बुक बॉण्ड मैदानावर दुपारी 3 वाजता येणार आहेत. आपण या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून महायुतीला जिंकविण्यासाठी येण्याचे आवाहनही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. तत्पूर्वी महायुतीच्या नमो संवाद यात्रा रविवारी दुपारी 3 वाजता कळमेश्वर, सायंकाळी 6 वाजता काटोल तर नरखेड येथील प्रचार सभेत यात्रेचा समारोप करण्यात आले. जागोजागी पोहचलेल्या नमो संवाद यात्रेतून राजू पारवे यांना विजय करण्यासाठी कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहयला मिळाला. सर्व समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. तसेच रामटेक लोकसभा निवडणुकीत राजू पारवेंच्या विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. विविध समाजातील बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.