मोवाड समस्याग्रस्त शहराला स्थायी मुख्यधिकारी मिळेल का ? 

राजेंद्र बागडे, प्रतिनिधी 

मोवाड नगरपरिषदेच्या कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोशे 

मोवाड :- मोवाड शहर हे ब्रिटिश कालीन इ.स. 1867 मध्ये स्थापन झालेली महाराट्रातील एकमेव नगरपरिषद म्हूणन मोवाड शहराला ओळखल्या जाते. या नगरपरिषदेमध्ये मुख्यधिकारी म्हूणन पल्लवी राऊत कार्यरत होत्या. परंतू नागरिकांच्या समस्याचे निराकरण करण्यात त्या असमर्थ ठरल्या त्यामुळे मोवाडच्या नागरिकांनी त्याची तक्रार उच्च अधिकाऱ्याकडे केली त्या कारणाने त्याची प्रशासनाने तडकाफडकी बदली करण्यात आली. बदली झाल्याने कर्मचारी व नागरिक यांचा अखेर सुटकेचा श्वास सुटला. परंतू काही का असो नगरपरिषद कार्यालय आता मात्र ओसाड दिसत आहे. प्रशासन कारभार कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे जिल्हाधिकारी इटनकर यांनी एक आदेश पत्र काढून नरखेडचे मुख्यधिकारी गवई यांच्याकडे मोवाड नगरपरिषदेचा अतिरिक्त चार्ज देण्याचे पत्र काढले होते. परंतू दुसऱ्याच दिवशी ते पत्र रद्द करून काटोलच्या मुख्यधिकाऱ्याकडे चार्ज देण्याचे पत्र काढले मात्र गवई यांना दिलेला आदेश रद्द का करण्यात आले हा मात्र चर्चाचा विषय ठरला आहे. काटोलच्या मुख्यधिकाऱ्या कडे चार्ज जरी दिला असला तरी मात्र ते येणार कधी यांचे निधान अनिश्चित आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी नियमित नगरपरिषद कार्यालयात दिसत नाही. नागरिकांच्या समस्याचे निराकरण होत नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमणात ओरड आहे.सद्या आवास योजनेचे काम झपाट्याने सुरु आहे शहरात ठिकठिकाणी नळाची पाईपलाईन लिकेज होऊन गंडूळ पाणी नळाला येत आहे तर नळाचे लिकेज खड्डे खोदून पडले आहे एखाद्या व्यक्तीचा अपघात या खोदलेल्या खड्ड्याने झाला तर याला जवाबदार कोण?10 वी, 12 वीचा निकाल लागल्यामुळे कागदपत्राची आवश्यता असते ते कागदपत्र कोण देणार,पावसाळा सुरु होण्याचे दिवस जवळ आले असले तरी नाल्या सफाई झाल्या नाही त्यामुळे या शहरात अनेक समस्या असल्याने येथे स्थायी मुख्यधिकारी शासनाने नेमून द्यावा अशी मागणी मोवाड शहरातील असंख्य नागरिकांनी, महिलांनी, युवा वर्गानी, प्रशासनाकडे केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी तीन महिन्यासाठी एकच पुस्तक

Fri Jun 16 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -पुस्तकातच वह्यांची पाने,30 जून पासून शाळांना होणार सुरुवात कामठी :– पहिली ते आठवी पर्यंतची पुस्तके एकात्मिक पद्धतीने चार भागात पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आली आहेत.पुस्तकात नोंदीसाठी वह्यांची पाने जोडण्यात आली आहेत.महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने पुस्तकातील वह्यांच्या पानांच्या प्रभावी वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. शासन निर्णयानुसार पाठयपुस्तकामध्ये वह्यांच्या पानांचा समावेश केला असून ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com