432 संकटग्रस्त महिला व मुलींना वन स्टॉप सेंटर ने दिला मदतीचा हात

गडचिरोली :- संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उदेशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडुन “सखी वन स्टॉप सेंटर ”ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे.

सखी वन स्टॉप सेंटर या नावाने प्रसिध्‍द असलेली ही योजना 1 एप्रिल2015 पासुन लागू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या निकषानुसार शारीरी, लैगींक, भावनिक, मानसिक आणि आर्थिक शोषनाला बळी पडलेल्या अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीसह सर्व महिलांना आवश्यक ती मदत सखी वन स्टॉप सेंटर च्या छताखाली दिल्या जाते.

जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात केंद्र पुरस्कृत महिला व बाल विकास द्वारा संचालीत सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली द्वारा आतापर्यंत 432 संकटग्रस्त महिला व मुलींना मदतीचा हात देण्यात आले आहे.

सखी वन स्टॉप सेंटर मध्ये एकावेळी पाच महिलांना राहण्याची, भोजन, चहा, नाश्ताची सुविधा आहे. किमान पाच दिवसाचा तात्पुरता निवारा तथा महिलांचे समुपदेशन, न्यायालयीन व पोलीस विषयक मदत, वैद्यकीय मदत अशा अनेक सेवा एका छताखाली देवून कौटूंबिक हिंसाचार, तनाव यासारख्या प्रकरणांचा या सेंटरद्वारा निपटारा करुन त्यांचे कुटूंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ज्या महिलांना व मुलींना पुनर्वसनाची गरज आहे अशांना वन स्टॉप सेंटर द्वारा पुनर्वसीत करण्यात येते. विविध हिंसाचारातील पीडीत मुली व महिला ह्या कधी स्वत:, आई-वडीलांकर्वी तर कधी पोलीस यंत्रणेद्वारा सखी वन स्टॉप सेंटरला दाखल होतात अशा महिला व मुलींना त्या-त्या संदर्भांत आवश्यक समुपदेशन तथा सहाय्य करुन त्यांना पुढील जीवन सुकर करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जातात.

कुमारी मातांची प्रसुती, नको असलेल्या बाळांचे कायदेशीर पुनर्वसन तथा बहूमुल्य समुपदेशन कुमारी मातांची प्रसुती, पीडीतांना नको असलेल्या बाळांचे कायदेशीर पुनर्वसन, पीडीत मुलांना शाळेत व बाल सुधारगृहात दाखल करणे, मनोरुग्न महिलांचे उपचारार्थ मदत व पुनर्वसन, घरगुती हिंसाचार व मतभेद असणाऱ्या पिडीत महिलांना समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन व पुनर्वसन अशा अनेक जबाबदाऱ्या सखी वन स्टॉप सेंटर च्या माध्यमातुन पार पाडल्या गेल्या.

जिल्हाधिकारी, अविश्यांत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनात एका छताखाली अनेक सुविधा सर्व संकटग्रस्त महिलांना उपलब्ध असल्याची माहिती सखी वन स्टॉप सेंटर च्या केंद्र प्रशासक प्रणाली बी. सुर्वे (प्र) यांनी दिली आहे.

संकटग्रस्त / पीडीत मुली व महिलांच्या मदतीला सदैव तत्पर असणारे सखी वन स्टॉप सेंटर च्या जनजागृती पर कार्यक्रमाच्या माध्यमातून घर, परिवार, समाज, नातेवाईक व अन्य प्रकारे दु:खी महिलांनी सखी वन स्टॉप सेंटर शी संपर्क करावा किंवा गरजु महिलांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या 181 या महिला हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा अथवा प्रत्यक्ष भेट द्यावी व मदत घ्यावी असे आवाहन केंद्र प्रशासक प्रणाली बी. सुर्वे (प्र) तथा इतर सर्व कर्मचारी वर्गाने केले आहे.

संपर्क कुठे करावा ?

हेल्पलाईन क्रमांक :- 181

कार्यालय संर्पक क्र. :- 07132-295675

वन स्टॉप सेंटर मोबाई क्र. :- 9404354543

पत्ता :- जुनी धर्मशाळा इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, मुल रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गडचिरोली जिल्ह्यासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

Tue Feb 4 , 2025
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, या जिल्ह्याबाबत वेगळ्या दृष्टीने विचार करून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यासोबतच यंत्रणेने रोजगाराला चालना देणाऱ्या व शाश्वत विकास साध्य करणाऱ्या योजनांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2025-26 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!