गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराला चालना देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :- मोहाच्या फुलापासून इथेनॉल सारखे इंधन तयार करण्यास प्राधान्य देऊन गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या रोजगाराला चालना देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद आज सांगितले.

सदस्य सत्यजित तांबे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दारू निर्मितीविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. अभय बंग हे गडचिरोली जिल्ह्यात व्यसनमुक्ती शिबिरे राबवत आहेत. जिल्ह्यातील व्यसनमुक्ती आणि दारू निर्मिती विरोधात धोरण ठरविण्यात येणार आहे. हे धोरण ठरविताना डॉ. बंग यांनाही विश्वासात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात मोहाच्या फुलांसदर्भात माहिती घेतली जाईल. तेथे नैसर्गिक संपत्तीपासून उद्योग वाढीसाठी, आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करणे, व्यवसाय वृद्धी करता निर्णय घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भालाफेक प्रकारात भाग्यश्रीला सुवर्णपदक

Tue Dec 12 , 2023
– खेलो इंडिया पॅरा गेम्स – ॲथलेटिक्समध्ये तीन रौप्यपदकांचीही कमाई – अक्षय सुतारला लांब ऊडीत ब्राँझपदक – ऋतुजा कवटाळेला २०० मीटरमध्ये ब्राँझपदक – बॅडमिंटनमध्ये आरती पाटील अंतिम फेरीत नवी दिल्ली :- महाराष्ट्राच्या पॅरा क्रीडापटूंनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत जोरदार सुरुवात करताना सोमवारी ॲथलेटिक्स प्रकारात एक सुवर्ण आणि तीन रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली. बॅडमिंटनमध्ये आरती पाटीलने अंतिम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com