नवीन वाळू धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सुधारणा करणार – महसूल मंत्री विखे पाटील

मुंबई :- राज्य शासनाने वाळू आणि गौण खनिजबाबतचे धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून काही सूचना असतील तर त्याचा अभ्यास करून धोरणामध्ये आवश्यक सुधारणा केली जाईल असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

रायगड जिल्ह्यातील कुंडेवहाळ येथून मुंबईतील विकास कामाकरिता वाळू व खडीचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून होत असलेला गैरव्यवहार याबाबतचा प्रश्न सदस्य प्रशांत बंब यांनी उपस्थित केला होता.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, जे प्रमाण ठरले आहे त्यानुसार वाळूचा वापर होत आहे. अनेक ठिकाणी वाळू डेपो सुरू केले आहेत. अधिकाधिक डेपो सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच या पोर्टलमधील त्रुटी दूर करण्याचे कामही सुरू आहे.यात घरकुलांना प्राधान्य देण्यात येत आहे. शासकीय क्रश सँण्ड वापरण्याचे धोरण आणण्याचा विचार आहे, असेही महसूलमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

सदस्य बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, हरिभाऊ बागडे, नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी ही यावेळी प्रश्न उपस्थित केले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी कायदा करण्याबाबत छाननी प्रक्रिया सुरु - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thu Aug 3 , 2023
मुंबई :- कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी विशेष कायदा करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडून काही मुद्यांबाबत माहिती मागविली असून त्या अनुषंगाने छाननी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. कोल्हापूर येथील श्री. महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर संदर्भात शासनाकडून विशेष कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्याप्रमाणे श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी कायदा करण्यात यावा याबाबत सदस्य गोपीचंद पडळकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com