रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार

– ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत

नवी मुंबई :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन २०२३-२४ साठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह २५ सप्टेंबरपर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार” तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार” देण्यात येतो.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील “अ” “ब” “क” “ड” वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 1 लाख, रुपये 75 हजार, रुपये 50 हजार, रुपये 25 हजार सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये 50 हजार तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये 25 हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. असे प्र.सहायक ग्रंथालय संचालक,मुंबई विभाग कोकणभवन मंजूषा साळवे यांनी एका प्रसिध्द पत्रकान्वये कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘…लाडकी बहीण’ योजनेमुळे गरोदरपणात आधार

Thu Aug 29 , 2024
नागपूर :- महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांकडून शासनाच्या हेतू पूर्तीची पावतीही आपसूक मिळतांना दिसत आहे. हिंगणा तालुक्यातील वागदरा येथील लक्ष्मी मंगेश नागपुरे सांगतात या योजनेचे 3 हजार रुपये बँक खात्यात 15 ऑगस्ट रोजी जमा झाले. राज्याचे मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या बहीणीला ही मदत ऐन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!