बेला :- वनपरिक्षेत्र बुट्टीबोरी अंतर्गत येणाऱ्या आमघाट उपवन क्षेत्रातील बेला नजीकच्या बोरीमजरा खेडेगावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वन्यजीव सप्ताह उत्साहाने साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. वाडे होते. वन सहाय्यक अधिकारी ए. व्हि. जनावर, मुख्याध्यापक एकनाथ पवार यावेळी उपस्थित होते.
वाघ हा अन्नसाखळीतील मुख्य घटक असल्याने त्याला वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. जंगल जीवनावश्यक वस्तूची पूर्तता करते. प्रत्येक प्राणी हा आपल्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. असे मौलिक मार्गदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे यांनी केले . सर्पमित्र अनुज धाबर्ड व चमुने विषारी व बिनविषारी सापाबद्दल समज, गैरसमज असलेली माहिती जनतेला दिली. कार्यक्रमाचे संचालन रवी पोराटे यांनी केले तर आशा कापगते यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनेश पडवाल, क्रांती चव्हाण,सर्पमित्र दिशांत मेंढे, निशांत टेंगरे, संकेत सेलकर, संदीप हेडाऊ वनविभागाचे पदाधिकारी कर्मचारी, शालेय विद्यार्थी व गावातील नागरिकांनी सहकार्य केले.