विदर्भ, मुंबईत भाजपला का बसला धक्का, समजून घ्या पाच मुद्यांमधून

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा विदर्भ आणि मुंबई विभागात चांगलाच फटका बसला. विदर्भातील दहा जागांपैकी महायुतीला तीन जागा मिळाल्या. त्यात बुलढाण्याची जागा शिंदे सेनेची आहे. दुसरीकडे मुंबईतील सहा जागांपैकी दोन जागा भाजपला मिळाल्या. त्यात एका जागेवर शिंदे सेनेचा निसटता पराभव झाला आहे. भाजपचा हा पराभव का झाला? याचे विश्लेषण पक्षाच्या बैठकीत केले जाणार आहे. पाच मुद्यांमधून भाजपच्या पराभवाची कारणे समजून घेऊ या…

तरुणांनी भाजपची साथ सोडली

विदर्भात लोकसभेच्या दहा जागा आहेत. त्यात काँग्रेसने चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली, अमरावती अन् भंडार येथे विजय मिळवला. वर्धामध्ये राष्ट्रवादीचा विजय झाला तर यवतमाळ-वाशिममध्ये उद्धव सेनेने बाजी मारली. भाजपला केवळ नागपूर आणि अकोल्याच्या जागेवर विजय मिळला. त्यातील नागपूरची जागा नितीन गडकरी यांच्या कामगिरीमुळे निवडून आली. इतर ठिकाणी तरुण, महिला भाजपची साथ सोडली.

मराठा आंदोलनाचा फटका

मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा फटका भाजपला बसला. मराठा सामजाला आरक्षण न मिळाल्यामुळे हा समाज महायुतीवर विशेषत: भाजपवर नाराज होता. तसेच मुस्लिम समाजानेही महायुतीला साथ दिली नाही. विरोधकांनी संविधान बदलणार असल्याचा मुद्दा प्रचारात लावून धरला. यामुळे दलित समाज भाजपपासून दूर गेला.

असली पक्षांनाच दिली साथ

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बंडखोरी झाली. ही बंडखोरी भाजपने घडवून आणल्याचा प्रचार शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केला. यामुळे राज्यातील जनतेची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ मिळाली. राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) यांना सहानभूतीचा फायदा मिळला.

शेतकऱ्यांची नाराजी

कापूस, सोयाबीन अन् कांदा हा विषय शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा होता. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. त्यामुळे शेतकरी नाराज होते. तसेच कापूस अन् सोयाबीनला भाव नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजप अन् महायुतीची साथ सोडली.

पक्षातील कार्यकर्ते नाराज

भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या पक्षातील लोकांना संधी दिली गेली आहे. दुसऱ्या पक्षातील आलेल्या लोकांना पदेही दिली गेली. यामुळे पक्षातील वर्षानुवर्ष मेहनत करणारे कार्यकर्ते नाराज झाले. त्या नाराजीचा फटका भाजपला बसला आहे.

Source by TV9 Marathi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे विश्व पर्यावरण दिवस साजरा

Wed Jun 5 , 2024
नागपूर :- ५ जून हा दिवस संपूर्ण जगात विश्व पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, विश्व पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन रविन्द्रकुमार सिंगल नागपूर शहर पोलीस आयुक्त यांचे हस्ते, आज दिनांक ०५.०६.२०२४ रोजी सकाळी ०७.०० वा. पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथील पथरीगढ़, डी लाईन, अधिकारी निवासस्थान जवळील, इंग्रेजकालीन १०० वर्ष जुन्या विहीरीची साफ-सफाई व पुर्नभरण अभियानाची सुरूवात करण्यात आली. यानिमीत्ताने संपूर्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com