कन्हान :- देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका संविधान बजावत असल्याने भारतीय राज्यघटने बाबत जागरू कता, तसेच संविधानाची मुल्ये देशाचे भावी नागरिक यांच्या पर्यंत पोहचावित यासाठी भारतीय संविधानास ७५ वर्ष पुर्ण झाल्या निमित्त सन २०२४-२५ संविधान अमृत महोत्सवी वर्षात ” घर घर संविधान ” उपक्रमा च्या जनजागृतीपर डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष व मराठा सेवा संघ कन्हान समन्वयक शांताराम जळते हयांनी मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभात संविधान भेट देऊन मान्यवर मंडळी चे स्वागत केले.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष तथा मराठा सेवा संघ कन्हान समन्वय क शिवश्री शांताराम जळते राह. कन्हान यांचे जेष्ठ चिरंजिव अक्षय आणि शिवश्री नरेंद्र केचे राह. अम रावती यांची कन्या चि.सौ.का. नीकिता यांचा शुभ विवाह गुरूवार (दि.२८) नोव्हेंबर ला कांचन रिसोर्ट अमरावती येथे थाटात संपन्न झाला. शनिवार (दि.३०) नोंहेबर २०२४ ला सायंकाळी ७ वाजता जय दुर्गा लॉन कांद्री येथे स्वागत समारंभास प्रामुख्याने उपस्थित बी आरएसपी चे संस्थापक अध्यक्ष सुरेश माने, प्रदेशाध्यक्ष विशेष फुटाणे, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राष्ट्रीय अध्यक्ष पप्पु पाटील भोयर, प्रदेश महासचिव सतिश काळे, विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, मराठा सेवा संघ नागपुर शहराध्यक्ष प्रमोद वैद्य, सचिव पंकज निंबाळकर, संभाजी ब्रिगेड नागपुर ग्रामिण अध्यक्ष संजय कानतोडे, मराठा सेवा संघ मौदा तालुकाध्यक्ष ईश्वर डाहाके आदी सह शंभर मान्यवरांना संविधान भेट देऊन स्वागत करून आगळयावेगळया परिवर्तनवादी उपक्रमाची सुरूवात करण्यात आल्याने कन्हान परिसरातुन शांता राम जळते यांचे कौतुक करित अभिनंदन करण्यात येत आहे.