संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
#) राष्ट्रीय सैम्बो कुस्ती मध्ये बीकेसीपी खेडाळुना १० स्वर्ण, ६ रजत व ४ कास्य असे २० पदक.
कन्हान :- राष्ट्रीय सैम्बो कुस्ती स्पर्धेत बीकेसीपी शाळा कन्हान च्या वीस विद्यार्थी खेडाळुन स्वर्ण, रजत व कास्य पदक प्राप्त करून कन्हान नगरीत पदार्पण करताच पालकवर्गानी वाज्या गाज्या, फटाक्याची आतिष बाजी करून खेडाळ व क्रिडा शिक्षकाचे पुष्पगुच्छ, पुष्पहार आणि गोड तोंड करून अभिनंदन करित जल्लोहषात स्वागत करण्यात आले.
औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या सैम्बो नँशनल चैम्पियन शिप मध्ये बीकेसीपी स्कुल कन्हान च्या विद्यार्थी खेडाळुनी राष्ट्रीय स्पर्धेत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून संपुर्ण भारत देशात दाखवुन दिले कि, आम्हची मेहनत आणि आम्हची कुशलता सर्वश्रेष्ठ सिध्द केली आहे. शाळेचे एनआयएस, एएफआय प्रशिक्षक श्री अमितसिंह ठाकुर सरांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेऊ न शाळेच्या २० विद्यार्थ्यी खेडाळुनी हरियाणा, पंजाब, दिल्ली, केरळ, राजस्थान, तेलंगाना, आंध्र प्रदेश च्या खेडाळुना आपल्या सुप्त कलेने मात करित राष्ट्रीय स्तरावरील सैम्बो चैम्पियनशिप मध्ये १० स्वर्ण,६ रजत व ४ कास्य पदक असे २० पदक पटकावित आपले व शाळेचे नाव गौरन्वित केले आहे.
यात १) वैष्णवी रविन्द्र कोतपल्लिवार स्वर्ण पदक, २) अनन्या अनिल मंगर स्वर्ण पदक, ३) आयुषी अजय ठाकरे स्वर्ण पदक, ४) दर्शन लोखंडे स्वर्ण पदक ,५) अदिति अमित ओमरे स्वर्ण पदक, ६) हर्षिका निक्खी सिरिया स्वर्ण पदक, ७) रितिका वीरेंद्र यादव स्वर्ण पदक, ८) बुलबुल योगेश्वर खरवार स्वर्ण पदक, ९) निर्भयी सुभाष मदन कर स्वर्ण पदक, १०) आयशा नसीम स्वर्ण पदक, ११ ) राजश्री राजेंद्र मानकर रजत पदक,१२) प्रियदर्शनी सिंह रजत पदक, १३) आनंदीप हरप्रित सिंह सिद्धू रजत पदक, १४) अवंती वानखेडे रजत पदक, १५) समिर लोणेश्वर देशमुख रजत पदक, १६) चैतन्य राऊत रजत पदक, १७) सानिका अनिल मंगर कांस्य पदक, १८) अग्रराज राकेश बोरकर कांस्य पदक, १९) प्रांजल येंडे कांस्य पदक, २०) राकेश चमेले कांस्य पदक आदीनी २० पदक पटकावित विजयश्री मिळवुन स्वत:चे शाळेचे, शहराचे, जिल्हयाचे व महा राष्ट्र राज्याचे नावलौकिक केल्याने शाळेचे संचालक राजिव खंडेलवाल, गेरोला, संस्था सदस्य अशोक भाटिया, मुख्याध्यापिका कविता नाथ, मुख्याध्यापिका (प्राथमिक) रूमाना तुरक, पालक शिक्षक संघ अध्यक्ष मोतीराम रहाटे, जेष्ट शिक्षक विनयकुमार वैद्य, शिक्षक, शिक्षिका व पालकवर्ग रविंद्र कोतपल्ली वार, अजय ठाकरे, अनिल मंगर, सुभाष मदनकर, अमित ओमरे, निक्की सिरिया, विरेंद्र यादव, योगेश्वर खरवार, हरप्रीत सिंह सिद्धु, लोणेश्वर देशमुख, राजेंद्र मानकर, राकेश बोरकर, वैशाली खंडार सह महिला व नागरिकांनी विजयी खेडाळु व क्रिडा शिक्षक अमित सिंह ठाकुर यांचे अभिनंदन करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.