स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकू – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

– ब्रह्मपुरीतील काँग्रेसच्या अनेक पदाधिका-यांचा, कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश      

ब्रह्मपुरी :-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मंगळवारी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी बावनकुळे बोलत होते. ब्रह्मपुरी विधानसभेतील गौरव अशोक भैय्याजी, नगर परिषद माजी गटनेते विलास विखार, माजी नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. सतीश कावळे, पंचायत समितीचे माजी सभापती नामदेव लांजेवार, सुरेश दर्वे यांसह अनेकांचे बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला.

यावेळी बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्यासाठी ह्या सर्वांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे लक्ष्य ठेवून भाजपा कार्य करत आहे. भाजपा नेतृत्व आणि कार्यावर विश्वास ठेवूनच मागच्या 50 वर्षांपासून काँग्रेसशी जोडलेल्या भैय्याजी कुटुंबातील अशोक भैय्याजी यांचे पुत्र गौरव, विखार, विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक कावळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल. नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांनी भाजपा सदस्य नोंदणी अभियानात सामील व्हावे, प्रमुख नेत्यांना सक्रीय सदस्य बनवावे, भाजपा संघटना वाढीचे काम करावे असे आवाहन बावनकुळे यांनी केले. पक्ष संघटना तुमच्या सदैव पाठीशी राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.

भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सुखदेव खेने, स्वप्नील सावरकर, मोहन वैद्य, बन्सीलाल कुर्जेकार, निलेश चिंचुरकर आदींचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी

Tue Mar 4 , 2025
मुंबई :- छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा सदस्य अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दोन्ही सभागृहात निवेदन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!