नागपूर – नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2022 करीता मा. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेस दि. 12.05.2022 अन्वये मंजूरी प्रदान केलेली आहे.
1) महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या – 24,47,494
(सन 2011 चे जनगणनेनुसार)
2) अनुसूचित जातीची लोकसंख्या (लगतच्या जनगणनेनुसार) – 4,80,759
3) अनुसूचित जमातीची लोकसंख्या (लगतच्या जनगणनेनुसार) – 1,88,444
4) प्रभागाची एकूण संख्या (त्रिसदस्यीय प्रभाग) – 52
5) निवडूण द्यावयाच्या महानगरपालिका संदस्यांची संख्या – 156
राज्य निवडणूक आयोगाचे दि. 23 मे 2022 च्या आदेशानूसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या करीता आरक्षण सोडतीचा दि. 31 मे 2022 रोजी कार्यक्रम राबविण्यात येऊन आरक्षित जागांची अंतिम अधिसूचना दि. 13 जून 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
उपरोक्त अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने दि. 02 जुन 2022 व 16 जुन 2022 अन्वये मतदार यादीचा कार्यक्रम दि. 01.01.2022 ही अर्हता दिनांक धरुन भारत निवडणूक आयोगाकडून दि. 31.05.2022 पर्यंत अद्यावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरुन प्रारुप मतदार यादी तयार करण्याबाबतचे आदेश व मतदार यादीचा पुढील प्रमाणे कार्यक्रम जाहीर केलेला आहे.
1) प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे – दि. 23.06.2022
2) प्रारुप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी – दि. 23.06.2022
ते 01.07.2022
3) अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिध्द करणे – दि. 09.07.2022
उपरोक्त कार्यक्रमानुसार 31 मे 2022 पर्यंत विधानसभेच्या मतदार यादी मध्ये समाविष्ट झालेल्या / वगळलेल्या / दुरुस्त्या इत्यादी विचारात घेऊन प्रभाग निहाय मतदार याद्यांचे विभाजन करुन प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी दि. 23.06.2022 रोजी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रिय झेान कार्यालयात तसेच मुख्य कार्यालयात, व nmcnagpurelection.org/nmcnagpur.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
दि. 23.06.2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या प्रारुप मतदार यादीत भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभेच्या अद्यावत मतदार यादी व्यतिरिक्त नविन नावाचा समावेश करणे, नावे वगळणे इत्यादी स्वरुपाची कार्यवाही मा. राज्य निवडणूक आयोगाकाडून केली जात नाही.
मतदार याद्यांचे विभाजन करतांना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदारांचा चुकून प्रभाग बदलने, विधानसभेच्या यादीत नांव असूनही प्रभागाच्या यादीत नांव नसने, या संदर्भातील दुरुस्त्या करण्या संबंधाने हरकती व सुचना असल्यास दि. 23.06.2022 ते दि. 01.07.2022 या कालावधीत संबधीत प्रभागाचे क्षेत्रिय झोन कार्यालयात व निवडणूक कक्ष मुख्यालय कार्यालयीन वेळेत हरकती व सुचना लेखी स्वरुपात दाखल करता येईल व दाखल सुचना हरकतीवर निर्णय घेवून प्रभाग निहाय अंतीम मतदार यादी दि. 09.07.2022 रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
उपरोक्त माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी पत्रकार परिषदेत दिले. पत्रकार परिषदेत अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, सहा.आयुक्त महेश धामेचा उपस्थित होते.